Curd On Hair  Team Lokshahi
लाईफ स्टाइल

Hair Care : दह्यात 'हे' तेल मिसळून केसांना लावा, कोंडा दूर होईल

जाणून घेऊया दह्यासोबत कोणते तेल कोंड्यापासून मुक्त होण्यास मदत करेल.

Published by : shweta walge

केसांमध्ये कोंडा झाल्यामुळे डोक्याला खाज येतेच, पण ते दिसायलाही वाईट दिसते. कारण हे कोंडा कधी कधी कपड्यांवर पडतात. कोंडा दूर करण्यासाठी बाजारात अनेक प्रकारचे शाम्पू उपलब्ध आहेत. पण या रासायनिक शाम्पूंमुळे केस कमकुवत होऊन तुटायला लागतात. त्याच वेळी, त्यांची चमक देखील निघून जाते. केसांना सुंदर आणि दाट बनवण्यासोबतच कोंडापासून मुक्ती मिळवायची असेल. तर मग जाणून घेऊया दह्यासोबत कोणते तेल कोंड्यापासून मुक्त होण्यास मदत करेल.

मोहरीच्या तेलात दही मिसळा

केसांसाठी मोहरीचे तेल खूप फायदेशीर आहे. त्यामुळे आजी हे तेल केसांना लावण्याचा सल्ला देत असते. यामुळे केसांच्या बहुतांश समस्यांपासून सुटका मिळते. दुसरीकडे, दह्यातील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म कोंडा कमी करण्यास मदत करतात.

दह्यासोबत मोहरीचे तेल कसे लावावे

दह्यासोबत मोहरीचे तेल लावण्यासाठी एका भांड्यात दही घ्या आणि त्यात एक चमचा मोहरीचे तेल मिसळा आणि पेस्ट तयार करा. आता हा पॅक टाळूवर लावा आणि सुमारे तासभर तसाच राहू द्या. नंतर केस सौम्य शाम्पूने धुवा. आठवड्यातून दोन ते तीन वेळा हा हेअर पॅक लावल्याने केसांमधला कोंडा नाहीसा होईल. त्याचबरोबर केस दाट, मऊ आणि चमकदार होतील.

जर तुम्हाला केसांना मजबूती आणि प्रोटीन ट्रीटमेंट द्यायची असेल तर तुम्ही दही आणि मोहरीच्या तेलाच्या हेअर पॅकमध्ये अंडी देखील घालू शकता. हा पॅक बनवण्यासाठी केसांच्या लांबीनुसार एका भांड्यात एक चमचे मोहरीचे तेल, दोन चमचे दही आणि एक अंडे मिसळा आणि पिवळा भाग मिक्स करा. नंतर चांगले फेटून त्याची स्मूद पेस्ट बनवा. केसांना मुळापासून टोकापर्यंत लावा आणि सुमारे 45 मिनिटे राहू द्या. नंतर केस सौम्य शाम्पूने धुवा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganeshotsav 2025 Toll-Free Passes: बाप्पाचा आर्शिवाद! कोकण प्रवासासाठी विशेष पास कसा मिळवायचा? जाणून घ्या...

Gold Rate Today : देशभरात सोने-चांदीच्या किमतींतील घसरणीला ब्रेक; तुमच्या शहरातील दर जाणून घ्या

Anjali Damania On Dhananjay Munde : 'ती' फाईल गायब केली' दमानियांचा धनंजय मुंडेंवर हल्लाबोल

Devendra Fadnavis Called Sharad pawar And Uddhav Thackeray : "आम्हाला तुमच्याही पाठिंब्याची गरज" फडणवीसांची थेट पवार आणि ठाकरेंना फोनवर विनंती; राजकीय वर्तुळात भूकंप