Health Tips
Health Tips Team Lokshahi
लाईफ स्टाइल

Health Tips: बॉडी तयार करण्यासाठी केळीचे योग्य प्रकारे करा सेवन, ही चूक तुमच्या आरोग्याला पोहोचवू शकते हानी

Published by : shweta walge

केळी हे आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ज्यांना वजन वाढवायचे आहे किंवा बॉडी बिल्डिंग करायची आहे अशा दुबळ्या लोकांनी केळीचे सेवन करावे. चांगले व्यक्तिमत्व, टोन्ड बॉडी आणि मजबूत स्नायू यासाठी केळी खाण्याची शिफारस केली जाते. शारीरिक तंदुरुस्ती संतुलित करण्यासाठी केळी देखील फायदेशीर ठरू शकते. केळीमध्ये अनेक गुणधर्म आढळतात, जे रोगांपासूनही संरक्षण देतात. पण जर तुम्ही तुमचे शरीर मजबूत करण्यासाठी केळीचे सेवन करत असाल तर ते योग्य पद्धतीने करा, चुकीच्या पद्धतीने केळी खाल्ल्याने शरीरावर विपरीत परिणाम होतात आणि ते आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतात.

केळीचे पौष्टिक गुणधर्म

रोज एक केळी खाल्ल्याने तुम्हाला अनेक आजारांपासून वाचता येते असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. केळ्यामध्ये व्हिटॅमिन ए, व्हिटॅमिन सी, मॅग्नेशियम, पोटॅशियम, व्हिटॅमिन बी6, थायामिन, रिबोफ्लेविन असते. केळीमध्ये पाणी, प्रथिने, कार्बोहायड्रेटचे प्रमाणही आढळते.

केळी खाण्याचे फायदे

अशक्तपणा

केळी खाल्ल्याने पोट लवकर भरते. जर तुम्ही सकाळी नाश्त्यासाठी केळी खाल्ल्यानंतर बाहेर गेलात तर दुपारच्या जेवणापर्यंत पोट भरलेले राहते आणि ऊर्जा टिकून राहते.

पचन

केळीच्या सेवनाने पचनाच्या समस्या दूर होतात. केळीमध्ये आढळणारे स्टार्च पचनसंस्थेसाठी चांगले असते. यामुळे छातीत जळजळ होण्याची समस्याही दूर होऊ शकते.

वजन

केळ्यामध्ये आढळणारे फायबर आणि स्टार्च पोट दीर्घकाळ भरलेले ठेवते. त्यामुळे भूक लागत नाही आणि वजनही नियंत्रणात राहते.

केळी खाण्याचे नुकसान

बद्धकोष्ठता

ज्यांना बद्धकोष्ठतेची तक्रार आहे त्यांनी केळीचे सेवन टाळावे.

साखर पातळी

साखरेच्या रुग्णांसाठी केळीचे सेवन हानिकारक ठरू शकते. केळ्यामध्ये नैसर्गिक साखर असते ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढू शकते.

केळी खाण्याची योग्य वेळ

केळी खाण्याची योग्य वेळ आणि पद्धत आहे. सकाळच्या नाश्त्यात केळी खाऊ शकता. केळी कधीही रिकाम्या पोटी खाऊ नये. रात्री झोपण्यापूर्वी केळी खाणे टाळावे. रात्री केळी खाल्ल्याने तुम्ही आजारी पडू शकता. यामुळे खोकल्याची समस्या उद्भवू शकते. यासोबतच पोट जास्त भरल्यामुळे निद्रानाशाची तक्रारही होऊ शकते.

केळी खाण्याची योग्य पद्धत

  • केळीसोबत दुधाचे सेवन करू नये. आयुर्वेदात केळी आणि दुधाचे मिश्रण निषिद्ध असल्याचे सांगितले आहे. डॉक्टरांच्या मते, यामुळे पचनक्रियेवर परिणाम होऊन निद्रानाश होऊ शकतो.

  • केळी स्मूदी खाऊ शकता

  • केळी आणि तूप एकत्र सेवन करता येते.

  • सकाळी नाश्त्यात केळी आणि दही मिसळून खाऊ शकता. वर्कआउटच्या आधी किंवा नंतर केळी आणि दही खाऊ शकता.

Daily Horoscope 29 April 2024 Rashi Bhavishya : 'या' राशींच्या लोकांचा शुभ काळ होणार सुरु; पाहा तुमचे भविष्य

दिनविशेष 29 एप्रिल 2024 : जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

फडणवीसांनी इंडिया आघाडीच्या नेत्यांना धाराशिवमध्ये धरलं धारेवर; म्हणाले, "मोदींच्या ट्रेनमध्येच..."

T20 World Cup Selection : धावांचा पाऊस पाडणाऱ्या के एल राहुलचा पत्ता कट? भारतीय संघात 'या' दिग्गज खेळाडूंची केली निवड

"...म्हणून नरेंद्र मोदींच्या अंगात औरंगजेब संचारलाय"; संजय राऊतांनी सासवडमध्ये महायुतीवर डागली तोफ