लाईफ स्टाइल

तेलकट त्वचेसाठी 'हे' 5 घरगुती फेसपॅक आहेत बेस्ट; आठवड्यातून एकदा लावा आणि फरक पाहा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Homemade Face Pack For Oily Skin : तेलकट त्वचा असलेल्या लोकांना त्यांच्या त्वचेची विशेष काळजी घेणे आवश्यक आहे. तेलकट असल्यामुळे चेहऱ्यावर पुरळ, छिद्रे पडणे अशा अनेक समस्या उद्भवू शकतात. अशा परिस्थितीत त्वचेच्या काळजीसाठी अशा गोष्टी निवडा ज्या तुमच्या त्वचेच्या प्रकाराला अनुकूल असतील आणि फायदेशीर ठरतील. तुमचा वेळ आणि मेहनत वाचवण्यासाठी आम्ही तुमच्यासाठी काही सर्वोत्तम फेस मास्कची यादी घेऊन आलो आहोत. चला तर मग जाणून घेऊया.

तेलकट त्वचेसाठी घरी फेसपॅक कसा बनवायचा?

केळीचा फेस पॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी तुम्हाला एका भांड्यात अर्धी केळी आणि दोन चमचे मध घेऊन ते चांगले मिसळावे लागेल. आता हा मास्क तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर लावा, कमीतकमी 20-30 मिनिटे कोरडा होऊ द्या आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. चांगल्या परिणामांसाठी आठवड्यातून एकदा हा पॅक लावा.

बेसन आणि दही फेस पॅक

हा पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात एक टेबलस्पून बेसन आणि एक टेबलस्पून दही मिक्स करून घट्ट पेस्ट तयार करा. हा पॅक तुमच्या चेहऱ्यावर आणि मानेवर वर्तुळाकार गतीने लावा. कमीतकमी 15-20 मिनिटे मसाज करा आणि नंतर थंड पाण्याने चेहरा धुवा. चांगल्या परिणामांसाठी, हा मास्क आठवड्यातून एकदा लावा.

काकडीचा फेस पॅक

हा फेस पॅक बनवण्यासाठी त्यात काकडीचा रस आणि एक चमचा दही मिसळा. या सर्व गोष्टी नीट मिक्स करून घट्ट पेस्ट बनवा आणि नंतर चेहऱ्यावर लावा. हा पॅक 20 मिनिटांसाठी लावा आणि कोरडे झाल्यानंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा. चांगल्या परिणामांसाठी, हा पॅक आठवड्यातून दोन ते तीन वेळा लावा.

कोरफड आणि मध

हा पॅक बनवण्यासाठी दोन चमचे कोरफडमध्ये एक चमचा मध घालून चांगले मिसळा. आता ही पेस्ट चेहऱ्यावर लावा आणि सुमारे 20 मिनिटे कोरडे होऊ द्या. नंतर कोमट पाण्याने चेहरा स्वच्छ करा.

Sanjay Raut : फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं

Sanjay Raut : प्रधानमंत्री मुंबईत येऊन 25 - 30 सभा घेतात, मग तुम्ही 10 वर्ष काहीच काम केलं नाही ना

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत घोषणा देणाऱ्या तरुणाने घेतली शरद पवार यांची भेट

भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांचं उद्धव ठाकरेंवर जोरदार टीकास्त्र; म्हणाले...

शिरूर मतदारसंघाच्या ईव्हीएम स्ट्राँगरुममधील सीसीटीव्ही 24 तास बंद