लाईफ स्टाइल

डब्यात ठेवलेल्या गरम चपात्या वाफेमुळे ओलसर आणि चिकट होतात? मग 'या' टिप्स नक्की फॉलो करा

चपात्या आपल्या रोजच्या आहारातला अविभाज्य भाग आहे. काहींना परिपूर्ण जेवणासाठी चपाती ही लागतेच. तसेच जेवणाची सुरुवात ही पहिला चपाती केली जाते.

Published by : Team Lokshahi

चपात्या आपल्या रोजच्या आहारातला अविभाज्य भाग आहेत. काहींना परिपूर्ण जेवणासाठी चपाती ही लागतेच. तसेच जेवणाची सुरुवात ही पहिला चपातीने केली जाते. चपात्या मऊ आणि गरमा-गरम खायला मज्जा येते. तसेच चपाती दुपारच्या जेवणापासून ते सकाळच्या नाश्त्यासाठी ही काही लोक खातात. यामुळे गृहिणी सकाळ्या नाश्त्यासोबत दुपारच्या जेवणासकट एकदाच चपात्या करतात. अशावेळी उरलेल्या चपात्या गृहिणी एखाद्या डब्यात झाकण लावून ठेवतात आणि थोड्या वेळाने वाफेमुळे झाकणाला सुटलेले पाणी चपात्यांवर पडते आणि त्यामुळे चपात्या सादळतात म्हणजेच ओलसर होऊन चिकट वाटतात. अशा वेळेस काय करावे हे जाणून घ्या...

चपात्या ओलसर आणि चिकट वाटू नयेत यासाठी या गोष्टी लक्षात ठेवा:

गरम चपात्या ठेवण्यासाठी जो डबा वापरला जातो तो डबा चपात्यांच्या आकारापेक्षा मोठा असावा याची काळजी घ्यावी. चपात्या डब्यात ठेवण्याआधी डब्याच्या तळाशी एक कापड किंवा रुमाल पसरवा त्याने तळाशी सुटणारे पाणी चपात्यांना न लागता रुमाल शोषून घेईल. असेच एखादे कापड किंवा रुमाल चपात्या डब्यात ठेवल्यानंतर सर्वात वरच्या चपातीवर पसरवा जेणेकरून झाकणाला सुटणारे पाणी चपात्यांवर न पडता कपड्यावर अथवा रुमालावर पडेल आणि चपात्या ओल्या होणार नाहीत.

गरम चपात्या डब्यात ठेवण्याआधी तळाशी जाळीदार डिश ठेवून त्यावर एक कॉटनचा रुमाल अंथरून घ्यावा आणि मग त्यावर चपात्या ठेवाव्यात. तसेच बटर पेपर तळाशी आणि वरच्या चपातीवर ठेवल्याने पेपरद्वारे चपात्यांना सुटलेले पाणी शोषून घेतले जाईल. त्याचप्रमाणे अ‍ॅल्युमिनियम फॉईलच्या तुकड्यात चपात्या गुंडाळून ठेवल्यामुळे गरम वाफेमुळे चपात्या सादळत नाहीत म्हणजेच ओल्या होत नाहीत.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा