लाईफ स्टाइल

Sofa Cleaning Hack: घरातील सोफा 'या' टिप्सने काही मिनिटांत करा स्वच्छ; ड्रायक्लीनरची गरजही नाही

सोफे कव्हरशिवाय खूप लवकर घाण होतात. अशा परिस्थितीत तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत याद्वारे तुम्ही सोफा सहज स्वच्छ करू शकता आणि अगदी नवीन सारखा बनवू शकता.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Sofa Cleaning Hack: किचन, बाथरुम किंवा घराचा कोपरा साफ करण्यासाठी तुम्ही बर्‍याच वेळा क्लीनिंग हॅक्स पाहिल्या असतील, याचा प्रयत्न करून तुम्ही तुमचे घर स्वच्छही केले असेल. पण ड्रॉईंग रूममधील सोफे स्वच्छ करण्यासाठी सहसा कोणत्याही टिप्स शेअर केल्या जात नाहीत आणि हे सोफे कव्हरशिवाय खूप लवकर घाण होतात. अशा परिस्थितीत तुम्हाला बाजारातून महागडे ड्रायक्लीनर आणून त्यांची स्वच्छता करावी लागते का? मग आज तुम्हाला अशा टिप्स सांगणार आहोत याद्वारे तुम्ही सोफा सहज स्वच्छ करू शकता आणि अगदी नवीन सारखा बनवू शकता.

घरातील सोफा कसा स्वच्छ करावा?

सोफा स्वच्छ करण्याचा सोपा मार्ग इंस्टाग्रामवर होमडेकोरमॅजिक नावाच्या पेजवर शेअर करण्यात आला आहे. हे करण्यासाठी तुम्हाला एका मोठ्या भांड्यात गरम पाणी घ्यावे लागेल. त्यात अर्धा ते एक चमचा लिक्विड डिटर्जंट घाला आणि चांगले मिसळा. आता एक जुने स्टीलचे भांडे घ्या आणि त्यावर जुना टॉवेल गुंडाळा. आता सोफा स्वच्छ करण्यासाठी टॉवेल गुंडाळलेला भांडे साबण आणि कोमट पाण्याच्या मिश्रणात बुडवा आणि तो सोफ्यावर फिरवा. यामुळे सोफ्यावरील घाण टॉवेलमध्ये दिसेल आणि तुमचा सोफा एकदम नवीनसारखा चमकू लागेल.

सोफा स्वच्छ करण्याचे हे तंत्र सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहे आणि 20 हजारहून अधिक लोकांनी हा व्हिडिओ लाईक केला आहे. काहीजण या क्लीनिंग हॅकला उपयुक्त असल्याचे म्हणत आहेत. तर काही जण म्हणत आहेत की खरंच आपणही अशा प्रकारे सोफा साफ करू. हा हॅक वापरून तुम्ही तुमचा पलंग, गाद्या, उशा आणि खुर्च्या देखील स्वच्छ करू शकता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा