लाईफ स्टाइल

कानाच्या मोठ्या छिद्रांमुळे इअररिंग्ज घालू शकत नाही? 'या' टीप्सने शस्त्रक्रियेशिवाय होतील लहान

काही महिलांच्या कानाचे छिद्र खूप मोठे असते. त्यामुळे जडच नाही तर हलक्या कानातलेही घालणे अशक्य होते. इतकंच नाही तर ते दिसायलाही वाईट आणि तुमच्या सौंदर्याला डाग लावण्याचं काम करते.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Tips to Shrink Stretched Ear Hole: इअररिंग्ज हा बहुतेक स्त्रियांच्या आयुष्यातील महत्त्वाचा भाग असतो. परंतु, काहीवेळा काही स्त्रिया इच्छा असूनही इअररिंग्ज घालू शकत नाहीत. कारण काही महिलांच्या कानाचे छिद्र खूप मोठे असते. त्यामुळे जडच नाही तर हलक्या कानातलेही घालणे अशक्य होते. इतकंच नाही तर ते दिसायलाही वाईट आणि तुमच्या सौंदर्याला डाग लावण्याचं काम करते.

बहुतेक महिला कानाचे छिद्र कमी करण्यासाठी शस्त्रक्रियेची मदत घेतात. पण, हे सगळ्यांनाच शक्य होत नाही. अशा परिस्थितीत, अगदी सोप्या घरगुती आणि स्वस्त पद्धतीचा अवलंब करून तुम्ही शस्त्रक्रियेशिवाय कानाच्या छिद्राचा आकार कमी करू शकता आणि आवडीचे इअररिंग्ज घालू शकतात.

सर्जिकल टेप वापरा

कानाच्या छिद्राचा आकार कमी करण्यासाठी तुम्ही सर्जिकल टेपची मदत घेऊ शकता. ही टेप शस्त्रक्रियेच्या दुकानात म्हणजे ज्या मेडिकल स्टोअरमध्ये ऑपरेशनशी संबंधित सामान उपलब्ध आहे तेथे कमी किमतीत सहज उपलब्ध आहे. ही टेप सामान्य बँडेजिंग टेपपेक्षा थोडी वेगळी आहे. त्यावर बारीक छिद्रे दिसतात ज्यामुळे हवा जाऊ शकते आणि त्यात चांगल्या प्रतीचा गोंद देखील लावला जातो.

कानाचे छिद्र लहान कसे करावे?

कानाचे छिद्र लहान करण्यासाठी, सर्व प्रथम टेपचा एक लहान भाग कापून घ्या. इअररिंग्ज घालण्याच्या जागेत कानाच्या मागे आरामात बसेल एवढी मोठी असावी. आपण टेपचे दोन कोट देखील वापरू शकता. यानंतर, कानाच्या छिद्रातून इअररिंग्ज घालून टेपमागून एक डॉट लावा.

तुम्हाला दिसेल की एका मिनिटात इअररिंग्ज कानात व्यवस्थित बसेल आणि कानाचे छिद्रही लहान दिसू लागेल. जर तुम्हाला त्याची कॅपॅसिटी वाढवायची असेल तर तुम्ही कानाच्या पुढच्या भागात देखील टेप वापरू शकता. याच्या मदतीने तुम्ही जी काही इअररिंग्ज घालाल, ती व्यवस्थित बसेल आणि कानाचे छीद्र सैल झालेले दिसणार नाही.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते