पावसाळा सुरु झाला आहे. पाऊस म्हंटलं की अल्लाहददायक वातावरण निर्माण होते. तसेच अनेक जण पावसात भिजून पावसाचा आनंद घेताना दिसतात. मात्र पावसाळ्यात त्वचेची तसेच नखांची काळजी घेणे गरजेचे असते. खासकरुन पायांची काळजी घ्यावी लागते. पावसाळ्यामध्ये पायाच्या नखांची योग्य ती काळजी न घेतल्यास फंगल इन्फेक्शनसारख्या समस्या उद्भवण्याची शक्यता असते. त्यामुळे पावसाळ्यात नखांची काळजी कशी घ्याल? हे जाणून घेऊया.
1. पावसाळ्यात पाय ओले राहू नये यासाठी चांगल्या प्रकारचे, स्वच्छ आणि चांगल्या प्रतीच्या चप्पल वापरणे गरजेचे आहे. पावसामध्ये ओले किंवा घट्ट शूज घालू नयेत. पावसाळ्यात बंद शूज वापरणे फायदेशिर ठरू शकते.
2. पावसाळ्यात पाय आणि नखांची योग्य स्वच्छता आणि काळजी घेतल्यास अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात. दररोज पाय स्वच्छ धुणे, कोरडे करणे, नखांची योग्य छाटणी करणे आणि योग्य फूटवेअर वापरणे यामुळे नखांचे आरोग्य टिकते.
3. नखांवर फंगल इन्फेक्शनची सुरुवात झाली असेल तर त्वरित तज्ज्ञांचा सल्ला घ्या. फंगल नखाचा रंग बदलणे, जास्त खवखवाट होणे किंवा वेदना होणे यांसारखे लक्षण आढळल्यास औषधोपचार सुरू करणे महत्त्वाचे आहे.
4. नख जास्त वाढले किंवा कुपीत (ingrown nail) झाले तर फंगल इन्फेक्शन होण्याची शक्यता वाढते. नख छाटताना नखांच्या कडा नीट साफ करा आणि छाटणी करताना जास्त खोलवर जाणे टाळा.
5. योग्य साफसफाईमुळे नखाच्या आजूबाजूच्या त्वचेचे संरक्षण होते आणि जंतूंची वाढ होत नाही. पावसाळ्यात पाय आणि नखांची योग्य स्वच्छता आणि काळजी घेतल्यास अनेक प्रकारच्या समस्या दूर होतात.
6. पावसाळ्यात पाय खूपदा ओले राहतात, त्यामुळे नखांमध्ये बॅक्टेरिया आणि फंगस वाढण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे दररोज पाय नीट स्वच्छ धुणे आणि नख कोरडे करणे अत्यंत गरजेचे आहे.
7. नखांखाली जास्त काळ ओलसरपणा राहू नये याकडे लक्ष द्या. घरातल्या स्वच्छ आणि कोरड्या मोज्यांचा वापर करा आणि शक्यतो पाय पूर्ण कोरडे करूनच जास्त वेळ घालवा.