कल्याण–डोंबिवली महापालिकेच्या निकालाने सगळ्यांनाच आश्चर्याचा धक्का दिला आहे. भाजप आणि शिंदे गटाची शिवसेना एकत्र लढूनही कोणालाच स्वतंत्र बहुमत मिळालेलं नाही. युतीला संख्याबळ जरी मिळालं असलं, तरी महापौर पदासाठी दोन्ही पक्षांमध्ये चुरस निर्माण झाली आहे.
या निवडणुकीत भाजपला 50, तर शिवसेनेला 53जागा मिळाल्या. उद्धव ठाकरे गटाने 11आणि मनसेने 5जागा जिंकत सत्तासमीकरणात महत्त्वाची भूमिका बजावली आहे. त्यामुळे महापौर निवडीसाठी राजकीय हालचालींना वेग आला आहे.
ठाकरे गटाची ताकद किती?
शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाने कल्याणमध्ये ७ नगरसेवकांचा अधिकृत गट स्थापन केला आहे. काही नगरसेवक अनुपस्थित राहिले असले तरी उरलेल्यांनी ठाकरेंना ठाम पाठिंबा दिला आहे. उमेश बोरगावकर यांची गटनेतेपदी, तर संकेश भोईर यांची प्रतोदपदी निवड झाली आहे.
ठाकरे गटासोबत असलेले 7 नगरसेवक:
तेजश्री गायकवाड
उमेश बोरगावकर
अपर्णा भोईर
संकेश भोईर
विशाल गारवे
वंदना माहिले
नीलेश खंबायत