Jyotiḥśāstra | maa laxmi blessing team lokshahi
लाईफ स्टाइल

यापैकी कोणतीही एक वस्तू तिजोरीत ठेवा, होईल माता लक्ष्मीची कृपा

तुमच्या तिजोरीकडे धन चुंबकासारखे खेचले जाईल

Published by : Shubham Tate

Jyotiḥśāstra : आपली तिजोरी नेहमी संपत्तीने भरलेली असावी अशी प्रत्येकाची इच्छा असते. हिंदू धर्मात लक्ष्मीला संपत्तीची देवी मानले जाते. अशा स्थितीत मां लक्ष्मीची कृपा आपल्यावर सदैव राहावी, असे लोकांना वाटते. मात्र, अनेक वेळा माणसाला मेहनत करूनही फळ मिळत नाही. वास्तुशास्त्रानुसार याची अनेक कारणे असू शकतात. वास्तुशास्त्रानुसार पैसे ठेवण्याची तिजोरी कधीही रिकामी ठेवू नये. ज्योतिष शास्त्रानुसार काही वस्तू तिजोरीत ठेवणे खूप शुभ मानले जाते. या वस्तू तिजोरीत ठेवल्याने देवी लक्ष्मीची कृपा सदैव तुमच्यावर राहते. (keep these 5 things in tijori with money to get maa laxmi blessings)

हळकुंड

ज्योतिष शास्त्रानुसार संपत्ती ठेवण्यासाठी तिजोरीत हळकुंड ठेवल्याने आर्थिक स्थिती सुधारते. हळकुंड हिंदू धर्मातील अनेक धार्मिक कार्यातही वापरले जाते. यासाठी शुक्रवारी लाल कपड्यात हळकुंड गुंडाळून ठेवा. यामुळे माँ लक्ष्मीची कृपा होईल आणि तिजोरी संपत्तीने भरली जाईल.

कमळाचे फूल

देवी लक्ष्मीच्या पूजेमध्ये तिला कमळाचे फूल अर्पण केले जाते. कमळाचे फूल हे लक्ष्मीचे आसन आहे. त्याचबरोबर हे फूल भगवान विष्णूंनाही प्रिय आहे, त्यामुळे कमळाचे फूल भगवान विष्णूंच्या हातात राहते. तिजोरीत कमळाचे फूल ठेवणे खूप शुभ मानले जाते. लक्ष्मीची पूजा करताना कमळाचे फूल अर्पण करावे आणि नंतर ते आपल्या तिजोरीत ठेवावे. फूल सुकल्यानंतर तेथून लगेच काढून टाका. कमळाचे फूल ठेवल्याने धनसंपत्ती वाढते आणि देवी लक्ष्मीची कृपा होते.

लाल कापड

असे मानले जाते की लक्ष्मीला लाल रंग खूप प्रिय आहे. शुक्रवारी 11 किंवा 21 रुपये लाल रंगाच्या कपड्यात बांधून ठेवा. असे केल्याने धनप्राप्ती होते.

यातील माहिती ही गृहितकांवर आधारित आहे

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा