आजकाल सगळ्यांनाच आरोग्यदायी जीवन जगायला आवडते. यासोबच पौष्टिक असे झटपट पदार्थ बनवता येतील? याचादेखील विचार करतात. यासाठी तुम्ही नाचणी आणि पालकच्या वापराने चविष्ट आणि पौष्टिक असे धिरडे बनवू शकता. नाचणी आणि पालक हे तुमच्या शरीरासाठी खूपच आरोग्यदायी असते. तसेच यातील गुणधर्मदेखील तुम्हाला फायद्याचे ठरतील.
आज आपण नाचणीच्या पीठाचा वापर करून केल्या जाणाऱ्या चविष्ट धिरड्याची रेसिपी जाणून घेणार आहोत. ही हेल्दी आणि टेस्टी रेसिपी तुम्ही सुद्धा नक्की ट्राय करून पहा. चला तर मग जाणून घेऊयात नाचणीच्य धिरड्याची पौष्टिक रेसिपी.
नाचणी-पालकचे धिरडे बनवण्यासाठी लागणारे साहित्य :
नाचणीचे पीठ
बेसन
अर्धी वाटी दही
चवीनुसार मीठ
कोमट पाणी
हिरव्या भाज्या
तिखट
कोथिंबीर
तेल किंवा तूप
नाचणी-पालकचे धिरडे बनवण्याची प्रक्रिया :
एका भांड्यात किंवा परातीमध्ये नाचणीचे पीठ घ्या.
या पीठामध्ये बेसन, अर्धी वाटी दही, मीठ,तिखट आणि हिरव्या भाज्या मिसळा
आता यामध्ये कोमट पाणी मिसळून हे सर्व चांगल्या प्रकारे एकत्र करून पीठ घट्ट बनवा.
आता या पीठात तूप किंवा तेल घाला.
त्यानंतर, गॅसवर पॅन किंवा तवा ठेवा.
आता या पॅन किंवा तव्यावर तेल किंवा तेल पसरवा आणि नाचणीच्या धिरड्याचे पीठ पसरून घ्या.
हे धिरडे आता दोन्ही बाजूंनी सोनेरी होईपर्यंत चांगले शिजवून घ्या.
तुमचे नाचणीचे धिरडे तयार आहे.
आता गरमागरम नाचणीचे धिरडे लोणचे, टोमॅटो सॉस किंवा चटणीसोबत खाऊ शकता.