गुळ खाणे हे आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर मानले गेले आहे. गुळामुळे आपल्या शरीरात अनेक फायदे होतात पण हिवाळ्यात गूळ खाल्ल्याने त्याचे फायदे दुप्पट होतात. गुळ केवळ त्याच्या विशिष्ट चवीसाठीच नाही तर त्याच्या असंख्य आरोग्य फायद्यांसाठी देखील वेगळे आहे. उसाच्या रसापासून मिळवलेला हा साखरेचा पर्याय फार पुर्वीपासुन विविध संस्कृतींमध्ये आहारातील मुख्य घटक आहे.
पोषक घटकांनी युक्त गुळ
गुळ केवळ गोड पदार्थ नसुन पौष्टिक सुपरफूड आहे. लोह, मॅग्नेशियम, पोटॅशियम आणि जीवनसत्त्वे यासारख्या आवश्यक जीवनसत्त्वे आणि खनिजांनी भरलेले गुळ आपल्या शरीराला खूप जास्त फायदेशीर आहे. तुमच्या आहारात गुळाचा समावेश तुमच्या शरीरातील पौष्टिकतेचे प्रमाण वाढवण्याचा एक स्वादिष्ट मार्ग असू शकतो.
गुळातील लोहाचे प्रमाण लोहाची कमतरता किंवा अशक्तपणाचा धोका असलेल्या व्यक्तींसाठी अत्यंत गुणकारी आहे. नियमितपणे गुळाचे सेवन केल्याने हिमोग्लोबिनची पातळी वाढते, ज्यामुळे पेशी मध्ये ऑक्सिजनचे प्रमाण सुरळीत होते. गुळाचे सेवन रक्त स्वच्छ होते. ज्यामुळे त्वचा निरोगी होते आणि त्वचेच्या विविध समस्या टाळता येतात तसेच गुळामध्ये अँटीऑक्सिडंट्सचे प्रमाण अधिक असल्याने आपल्या आपल्या आरोग्याला गुळ नैसर्गिक तेज प्रदान करते.
दमा किंवा ब्राँकायटिससारख्या श्वसनाच्या समस्या असलेल्या व्यक्तींसाठी फायदेशीर आहे. गुळाचे अँटी-एलर्जिक गुणधर्म श्वसनमार्गाला आराम देऊन श्वसनाशी संबंधित आजार कमी करून आराम देऊ शकतात.
पचन सुधारण्यास मदत :
गुळामुळे पचन सुधारते. तसेच बद्धकोष्ठतेचा धोका असलेल्यांसाठी, दैनंदिन आहारात थोड्या प्रमाणात गुळाचे सेवन केले पाहिजे. गुळातील पोटॅशियमचे प्रमाण शरीरातील इलेक्ट्रोलाइट्सचे संतुलन राखण्यात महत्त्वपूर्ण भूमिका बजावते. यामुळे, रक्तदाब नियंत्रित होण्यास हातभार लागतो.
मासिक पाळीवेळी फायदेशीर :
मासिक पाळीच्या वेळी महिलांना होणाऱ्या त्रासापासून अनेकदा गुळाचे सेवन केल्याने समाधान मिळते. मासिक पाळीसोबत येणारा थकवा आणि अशक्तपणा यांसारखी लक्षणे कमी करते.