लाईफ स्टाइल

Curd VS Yogurt : दही आणि योगर्टमधील 'हा' फरक माहीत आहे का?

दही आणि योगर्ट: आरोग्यासाठी कोणता पर्याय अधिक लाभदायक?

Published by : Shamal Sawant

दह्याचा वापर सर्सास केला जातो. घरी लावलेले दही खूप पोषक असते. मात्र आजकाल बाजारातदेखील तयार दही मोठ्या प्रमाणात मिळते. जेवण दुपारचे असो किंवा रात्रीचे जेवण दही हा पदार्थ असतोच. मात्र आता बाजारात योगर्ट प्रचलित झाले आहे. विशेषत: शहरांमध्ये लोक आता दह्याऐवजी योगर्टला आरोग्यदायी पर्याय मानू लागले आहेत. फिटनेसप्रेमी आता दह्याऐवजी योगर्टचा आहारात समावेश करत आहेत. दही आणि योगर्ट हे अनेकांना सारखेच वाटते. पण तसे नाही आहे. ते दिसायला सारखे असले तरी त्यांची चव, तयारी प्रक्रिया, फायदे आणि पौष्टिक घटक बरेच वेगळे आहेत. आता आपण दही आणि योगर्टमधील फरक जाणून घेऊया.

दही आणि योगर्टमध्ये काय फरक ? 

दह्यापेक्षा योगर्टमध्ये जास्त लैक्टोज आढळते. म्हणूनच ज्या लोकांना लैक्टोज चालत नाही, त्यांना दही हा पर्याय उत्तम वाटतो. विशेषतः ग्रीक दही, ज्यामध्ये प्रथिने जास्त असतात.

जास्त फायदेशीर काय आहे?

दही आणि योगर्ट दोन्ही आरोग्यासाठी फायदेशीर आहेत. दही हे प्रथिने, पोटॅशियम, मॉलिब्डेनम, पॅन्टोथेनिक अॅसिड (म्हणजे व्हिटॅमिन बी5) चा चांगला स्रोत आहे. वजन कमी करू इच्छिणाऱ्यांसाठी हे फायदेशीर आहे.

कोणासाठी अधिक फायदेशीर ?

यातील पोटॅशियम उच्च रक्तदाब असलेल्या लोकांसाठी खूप फायदेशीर आहे. तसेच योगर्टमध्ये प्रोबायोटिक्स देखील आढळतात, जे आपल्या पोटाचे आरोग्य राखण्यास मदत करतात. हे आतड्यांमधील चांगले बॅक्टेरिया वाढवते, जे पचनसंस्था मजबूत करते आणि रोगप्रतिकारक शक्ती वाढवते.

अनेक फ्लेवर्सदेखील उपलब्ध :

बाजारात तुम्हाला योगर्टचे अनेक प्रकार आढळतील. स्ट्रॉबेरी, ब्लूबेरी, ग्रीक दही आणि आंबा. दह्यामध्ये अनेक घरांमध्ये लोक मीठ, साखर, गूळ किंवा काही मसाले घालून ते खातात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Devendra Fadnavis on Thackeray Brothers : "ब्रँडचा बॅन्ड वाजवला" मुख्यमंत्र्यांनी ठाकरे बंधूंना खोचक टोला

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते