लाईफ स्टाइल

Chicken : प्रोटीनची गरज पूर्ण करण्यासाठी चिकन खात आहात? तर मग हे वाचाच

या प्रथिनांची गरज अनेक पदार्थांमधून पूर्ण होते. यातील एक पदार्थ म्हणजे चिकन.

Published by : Shamal Sawant

सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या शरीराला किती अन्नाची गरज आहे? तसेच कोणते अन्न खाल्ले जावे? याबद्दल नेहमीच चर्चा होताना दिसते. आजकालच्या धकाधकीच्या जीवनात अनेकदा आवश्यक असलेल्या घटकांची गरज पूर्ण करता येत नाही. मात्र प्रथिने शरीरासाठी अधिक गरजेचे असतात. या प्रथिनांची गरज अनेक पदार्थांमधून पूर्ण होते. यातील एक पदार्थ म्हणजे चिकन.

चिकन हा प्रोटिन म्हणजेच प्रथिनांसाठी महत्त्वाचा पदार्थ मानला जातो. फिटनेसप्रेमींसाठी चिकनचे सेवन अधिक प्रमाणात करतात. अमेरिकेतील प्रसिद्ध जर्नल न्यूट्रीएंट्समध्ये प्रकाशित झालेल्या संशोधनानुसार, अधिक प्रमाणात चिकनचे सेवन करणे शरीरासाठी हानिकारक ठरू शकते. समोर आलेल्या माहितीनुसार, जे व्यक्ती आठवड्याला 300 ग्रॅमपेक्षा अधिक चिकन खातात त्यांना पोटाचे आजार आणि कर्करोग होण्याचे प्रमाण 27 % अधिक असते. हे प्रमाण पुरुषांमध्ये अधिक असल्याचे समोर आले आहे.

यासंदर्भात केलेल्या संशोधनामध्ये अधिक चिकन खाणाऱ्या व्यक्तींमध्ये गॅस्ट्रोइंटेस्टाइनल कर्करोगामुळे मृत्यू होण्याचे प्रमाणही सर्वाधिक होते. मात्र हे संशोधन करत असताना मर्यादादेखील पाळल्या गेल्या. चिकन कसे शिजवले आहे? याबद्दल सविस्तर माहिती घेतली नाही. मात्र असे असले तरीही चिकन खाणे थांबवू नये. परंतु ते किती प्रमाणात खावे? यावर मात्र तज्ञांचा सल्ला नक्की घ्या.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Asia Cup 2025 IND vs PAK Live Update : पाकिस्तानची टोळी 127 धावांवर बाद, भारतासमोर 128 धावांचे आव्हान

PM Narendra Modi On Congress : “मी शिवाचा भक्त, विषही प्राशन करेन” पंतप्रधान मोदींची काँग्रेसवर टीका

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींंना दागिने खरेदी करण्यासाठी उत्तम योग, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य

आजचा सुविचार