लाईफ स्टाइल

Lipstick History : 5000 वर्षांचा प्रवास आणि जगातील सर्वात महागडी लिपस्टिक

मात्र लिपस्टिकचा नेमका इतिहास काय आहे? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

Published by : Shamal Sawant

लिपस्टिक हा प्रत्येक महिलेच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा भाग म्हणायला हरकत नाही. प्रत्येक महिलेच्या मेकअप किटमध्ये लिपस्टिक ही प्रामुख्याने दिसून येतेच. आजकाल तर लिपस्टिकमध्ये अनेक शेड्सदेखील बघायला मिळतात. तुमच्या त्वचेच्या रंगानुसार, तसेच टोननुसार लिपस्टिकची शेड बाजारात उपलब्ध आहे. मात्र लिपस्टिकचा नेमका इतिहास काय आहे? याबद्दल तुम्हाला माहिती आहे का?

लिपस्टिकचा इतिहास :

लिपस्टिकचा इतिहास हा सुमारे 5000 वर्ष जुना असल्याची माहिती समोर येताना दिसते. पूर्वी महिला ओठांना विशिष्ट रंग यावा यासाथी फुले किंवा मौल्यवान दगड बारीक करुन ओठांना लावत असत. 1880 मध्ये, गेरलेन नावाच्या फ्रेंच कंपनीने पहिल्यांदाच लिपस्टिक बाजारात आणली. ही लिपस्टिक हरणाच्या शरीरातून काढलेल्या चरबी, बीवॅक्स आणि एरंडेल तेलापासून बनवली जात असे. त्यानंतर ती रेशीममध्ये मिसळून वापरली जात असे.

1920 मध्ये, लाल, जांभळा, चेरी आणि तपकिरी अशा लिपस्टिकच्या वेगवेगळ्या शेड्स ट्रेंडमध्ये आल्या. याच काळात फ्रेंच रसायनशास्त्रज्ञ पॉल बौड्रॉक्स यांनी किस-प्रूफ लिपस्टिक तयार केली. जर आपण 1980 आणि 1990 या काळातील लिपस्टिकच्या ट्रेंड बद्दन बोलायचो झालो तर लाल लिपस्टिकने पुन्हा एकदा बाजारात ट्रेंड सेट केला आणि महिलांमध्ये ती आवडती बनली.

शिमर आणि ग्लॉस लिपस्टिकचा ट्रेंड :

शिमर आणि ग्लॉस लिपस्टिकचा ट्रेंडही याच काळात आला. जर आपण 1980 आणि 1990 या काळातील लिपस्टिकच्या ट्रेंड बद्दल बोलायचे झाले तर लाल लिपस्टिकने पुन्हा एकदा बाजारात ट्रेंड सेट केला आणि महिलांमध्ये ती आवडती बनली. शिमर आणि ग्लॉस लिपस्टिकचा ट्रेंडही याच काळात आला. 2000 नंतर लिपस्टिक मेकअपचा एक महत्त्वाचा भाग बनली. सध्या बाजारात अगदी कमी किंमतीपासून लाखो रुपयांपर्यंत लिपस्टिक बाजारात उपलब्ध आहेत.

जगातील सर्वात महागडी लिपस्टिक कोणती ?

'कॉचर ब्युटी डायमंड' ही जगातील सर्वात महागडी लिपस्टिक आहे, ती 140 लाख डॉलर्सना विकली गेली.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा