weight
weight  Lokshahi News
लाईफ स्टाइल

हिवाळ्यात कोणताही व्यायाम न करता वजन करा कमी

Published by : Team Lokshahi

हिवाळ्यातील थंडीच्या दिवसात अनेक लोक व्यायामाचा कंटाळा करतात. आणि व्यायाम न केल्यामुळे वजन वाढते. पण तुम्हला हिवाळ्यात वजन कमी करायचं असेल तर तुम्ही तुमची आहार घेण्याची पद्धत या ऋतूत बदलली पाहिजे. या ऋतूत शरीरातील चरबी कमी करण्यासाठी तुम्ही विविध पालेभाज्या, फळे यांचा समावेश तुमच्या आहारात केला पाहिजे. ज्यामुळे तुमच्या शरीरातील अतिरिक्त चरबीचे प्रमाण कमी होईल.

मुळा या भाजीमध्ये अनेक पोषक घटक असतात. जे शरीरासाठी खूप फायदेशीर ठरलेले आहेत. मुळा शरीरातील चरबी आणि वजन कमी करण्यास मदत करते. या हिवाळ्यात तुम्ही तुमच्या आहारात मुळा आवश्य समाविष्ट करा. मुळ्याची भाजी, कोंशिंबिर, मुळ्याचा ज्यूस, पराठा, अश्या प्रकारे तुम्ही तुमच्या आहारात मुळ्याचा समावेश करू शकता.

गाजरामध्ये भरपूर फायबर असते. जे वजन कमी करण्यासाठी हे खूप उपयुक्त आहे. ते खाल्ल्याने पचनशक्तीही मजबूत होते. हिवाळा या ऋतूत गाजर जरूर खा. गाजर खाल्ल्याने तुम्ही निरोगी राहाल आणि तुमचे वजनही कमी होईल.

बीटरूटमध्ये लोह आणि इतर अनेक प्रकारच्या जीवनसत्त्वे भरपूर प्रमाणात असतात, जे शरीरासाठी आरोग्यदायी असतात. हे खाल्ल्याने तुमच्या शरीरातील रक्त वाढते आणि वजन कमी करण्यासही ते उपयुक्त ठरते.

सफरचंद हे फळ आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. जर तुम्ही रोज याचे सेवन केले तर आजार तुमच्यापासून दूर जातील. यामुळे वजन कमी होण्यास मदत होते. हिवाळ्यात वजन कमी करण्यासाठी सफरचंदाचे सेवन जरूर करा.

नाशपतीमध्ये बरेच जीवनसत्त्वे आणि खनिजे असतात, म्हणून ते खाल्ल्याने आपल्या शरीराला जीवनसत्त्वे आणि आहारातील खनिजे मिळतात. जे वजन कमी करण्यास देखील मदत करते. या ऋतूत वजन कमी करण्यासाठी तुम्ही नाशपतीचे सेवन करू शकता. ते खाल्ल्याने भूक कमी लागते.

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळते, जे तुमच्या शरीरासाठी फायदेशीर आहे. हिवाळ्यात या फळाचे सेवन केल्यास वजन कमी होऊ शकते. हिवाळ्यात नसून इतर ऋतूत देखील तुम्ही संत्र्याचे सेवन केले पाहिजे. तेलकट, तिखट पदार्थ किंवा चरबीयुक्त पदार्थ न खाता या सारख्या फळ आणि भाज्यांचा वापर तुम्ही तुमच्या रोजच्या जेवणात केलात तर नक्कीच तुम्ही तुमचे वजन कोणताही व्यायाम न करता नियंत्रित ठेवू शकता.

"तुतारीची आता पिपाणी करायची आहे"; फलटणच्या सभेत उपमुख्यमंत्री फडणवीसांचा शरद पवारांवर हल्लाबोल

अलिबागच्या सभेत उद्धव ठाकरेंचा PM मोदींवर निशाणा, म्हणाले; "एकनाथ खडसेंचा मला फोन आला आणि..."

"छत्रपती शिवाजी महाराजांनी इतिहास घडवला पण आज परिस्थिती बदलली"; शरद पवारांचा PM नरेंद्र मोदींवर निशाणा

"३७० कलम हटवलं पण दहशतवाद अजून संपला नाही", सांगलीच्या सभेत आदित्य ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्लाबोल

“..तर पुढच्या वेळी आम्हाला काळे झेंडे दाखवा”, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी भोरच्या सभेत स्पष्टच सांगितलं