Monkeypox in India | WHO  team lokshahi
लाईफ स्टाइल

Monkeypox in India : मंकीपॉक्सचा आढळला पहिला रुग्ण, 5 जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट

केंद्राने मार्गदर्शक तत्त्वे केली जारी

Published by : Shubham Tate

Monkeypox in India : भारतात मंकीपॉक्सची पहिली घटना समोर आल्यानंतर केंद्र सरकार सतर्क झाले आहे. शुक्रवारी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने पाठवलेले 4 तज्ज्ञांचे पथक केरळला भेट देत आहे, मंकीपॉक्सचा पहिला रुग्ण आढळला होता. सरकारने पुन्हा मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत, ही तीच मार्गदर्शक तत्त्वे आहेत जी 31 मे रोजी जारी करण्यात आली होती. नुकतेच परदेश दौऱ्यावरून परतलेल्या केरळमधील 35 वर्षीय व्यक्तीला मंकीपॉक्स असल्याची पुष्टी राज्य सरकारने केली आहे. नवीन मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मंकीपॉक्सच्या बाबतीत केवळ जीनोम सिक्वेन्सिंग किंवा आरपीसीआर चाचणी केली जाईल. भारतात, मंकीपॉक्सच्या चाचणीसाठी 15 प्रयोगशाळा तयार करण्यात आल्या आहेत. (monkeypox first case in india high alert in 5 districts centre issues guidelines)

केंद्राने पुन्हा मार्गदर्शक सूचना जारी केल्या

मंकीपॉक्सचा संशयास्पद रुग्ण आढळल्यास त्याचे नमुने नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे येथे तपासणीसाठी पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. आता हा रोग अशा देशांमध्येही पसरत आहे जिथे तो आधीपासून नव्हता, म्हणून सरकारने आधीच मार्गदर्शक तत्त्वे जारी केली आहेत जेणेकरून प्रसार रोखता येईल. मार्गदर्शक तत्त्वांनुसार, मंकीपॉक्सची लागण झालेल्या व्यक्तीचे निरीक्षण केले जाईल आणि रुग्णाला 21 दिवसांसाठी अलगावमध्ये ठेवले जाईल.

केंद्र सरकारसोबतच राज्य सरकारही पूर्ण तयारी करत आहे. राज्याच्या आरोग्य मंत्री वीणा जॉर्ज यांनी एका उच्चस्तरीय बैठकीनंतर सांगितले की, तिरुअनंतपुरम, कोल्लम, पठाणमथिट्टा, अलाप्पुझा आणि कोट्टायम या पाच जिल्ह्यांमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आहे कारण या जिल्ह्यांतील लोक शारजा-तिरुवनंतपुरम इंडिगो फ्लाइटमध्ये संक्रमित व्यक्तीसोबत आले होते. मंत्री म्हणाले की विमानात 164 प्रवासी आणि सहा फ्लाइट क्रू मेंबर्स होते.

केरळ सरकारने तयारी केली

आरोग्यमंत्र्यांनी सांगितले की, या सर्व जिल्ह्यांमध्ये क्वारंटाईन केंद्रे सुरू केली जातील आणि संक्रमित व्यक्तीच्या शेजारी बसलेले 11 लोक उच्च जोखमीच्या लोकांच्या यादीत आहेत. याशिवाय रुग्णाचे आई-वडील, ऑटोचालक, टॅक्सी चालक आणि खासगी रुग्णालयातील स्किन डॉक्टर यांचाही यात यादीत समावेश आहे. मंत्री म्हणाले की, आरोग्य कर्मचारी संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात आलेल्या संशयितांच्या संपर्कात आहेत आणि त्यांना ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास त्यांची कोविड-19 चाचण्या केल्या जातील. मंकीपॉक्सची लक्षणे दिसली तरी चाचणी केली जाईल, असे त्यांनी सांगितले.

या विषाणूचे पहिले प्रकरण मे महिन्यात नोंदवले गेले होते आणि ते आतापर्यंत अनेक देशांमध्ये पसरले आहे. हा विषाणू वन्य प्राण्यांमध्ये पसरला तर त्यावर नियंत्रण मिळवणे कठीण होईल, अशीही चिंता वाढत आहे.

लक्षणे उशिरा दिसून येतात

डब्ल्यूएचओच्या म्हणण्यानुसार, जर हा विषाणू कमकुवत रोगप्रतिकारक शक्ती असलेल्यांना घेरला तर ते लवकर आजारी पडतात आणि धोका वाढतो. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने म्हटले आहे की मंकीपॉक्सची अचानक प्रकरणे दर्शवतात की संसर्ग मानवाकडून पसरतोय. हे संक्रमित व्यक्तीच्या त्वचेच्या किंवा थूंकीतून निघणाऱ्या विषांणूंमुळे पसरतो. हा विषाणू बाधित रुग्ण अनेक आठवडे फिरत राहतो आणि ही मोठी त्रासदायक बाब आहे. खरं तर, मंकीपॉक्सची लक्षणे दिसण्यासाठी 7 ते 15 दिवस लागू शकतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा