Heat Wave  Team Lokshahi
लाईफ स्टाइल

जाणून घ्या, उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे फायदे

उन्हाळ्यात खास करून जेवणाकडे विशेष लक्ष

Published by : Akash Kukade

उन्हाळ्यात (heat wave) खास करून जेवणाकडे विशेष लक्ष असते. तर कधी दुपारी अनेकवेळा चटकदार पदार्थ बनवली जातात. उन्हाळ्यात शरीरातील पाणी ( water ) तसेच एनर्जी टिकवून ठेवण्यासाठी आहारात फळांचा (fruits) वापर करणे आवश्यक असते. उन्हाळ्यात भरपूर पाणी प्यावे. कारण त्यामुळे डिहायड्रेशनची समस्या जाणवत नाही. उन्हाळ्यात पाण्याचे प्रमाण जास्त असलेल्या फळांचा समावेश डाएटमध्ये (diet) करावा.

टरबूज, खरबूज, काकडी यांचे सेवन उन्हाळ्यात करावे. यामधील खरबूजमध्ये अनेक अशी तत्वे असतात, ज्यामुळे शरीराला फायदा होतो. खरबूज या फळामध्ये 90 टक्के पाणी असते. ज्यामुळे भूक कमी लागते आणि शरीरामधील पाण्याचे प्रमाण वाढते.

जाणून घेऊयात खरबूज खाल्ल्यानंतर होणारे फायदे

खरबूज या फळामध्ये 'विटॅमिन सी'चे (vitamin - c ) प्रमाण जास्त असल्याने शरीराची इम्युनिटी (immunity) वाढते. त्यामुळे आठवड्यामधून किमान दोन वेळा खरबूज खावे.

खरबूज या फळामध्ये फोलिक अँसिडचे प्रमाण देखील जास्त आहे. ज्यामुळे नसांमध्ये रक्तांच्या गाठी होत नाही. तसेच ह्रदयाच्या संबंधित आजार किंवा समस्या देखील तुम्हाला जाणवत असतील, तर त्या देखील खरबूज खाण्याने दूर होतात.

किडनी स्टोनची (kidney stone ) समस्या जाणवत असेल, तर खरबूज या फळाचा डाएटमध्ये समावेश करावा. कारण खरबूजमध्ये पाणी आणि ऑक्सिकाइनचे प्रमाण जास्त असते. त्यामुळे किडनीच्या संबंधित समस्या दूर होतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा