Coconut Water Team Lokshahi
लाईफ स्टाइल

गर्भावस्थेत महिलांसाठी नारळाचं पाणी ठरतं वरदान; जाणून घ्या फायदे....

नारळाच्या पाण्याने आई आणि बाळ दोघेही निरोगी राहतात

Published by : prashantpawar1

महिला गर्भवती असताना डॉक्टर नेहमी त्यांना आहाराकडे विशेष लक्ष देण्याचा सल्ला देतात. अशा वेळी गरोदर महिलेने पौष्टिक आहार घेणे अत्यंत गरजेचे असते. यामुळे आई आणि बाळ दोघेही निरोगी राहतात. पौष्टिकतेने नारळाच्या पाण्याचे देखील नाव समाविष्ट आहे. नारळाच्या पाण्यात क्लोराईड, इलेक्ट्रोलाइट, रिबोफ्लेविन, कॅल्शियम, मॅग्नेशियम आणि व्हिटॅमिन सी भरपूर प्रमाणात असते. नारळ विकास मंडळाच्या मते गरोदरपणात नारळाच्या पाण्याचे सेवन केल्याने शरीरातील इलेक्ट्रोलाइट्स आणि द्रवपदार्थांची रोजची गरज भागते. चला जाणून घेऊयात गरोदर महिलेसाठी नारळाचे पाणी पिण्याचे काय फायदे आहेत.

गरोदरपणात नारळाचे पाणी पिण्याचे फायदे
नारळाचे पाणी शरीरातील रक्ताची पातळी वाढवण्यास मूत्रमार्गातील संसर्ग दूर करण्यासाठी आणि रक्तदाब कमी करण्यास मदत करते.

गरोदरपणात छातीत जळजळ होण्याच्या समस्येपासूनही नारळाच्या पाण्याने आराम मिळतो.

गरोदरपणात मॉर्निंग सिकनेस आणि थकवा यापासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही नारळाचे पाणी पिऊ शकता.

गर्भधारणेदरम्यान बद्धकोष्ठता ही एक सामान्य समस्या आहे. परंतु नारळाच्या पाण्याच्या सेवनाने ही समस्या तुम्हाला टाळता येते.

नारळाच्या पाण्यात कॅलरीज नगण्य असतात आणि त्यात ओमेगा-३ फॅटी अ‍ॅसिड आणि फायबर देखील भरपूर असते. ज्यामुळे गरोदरपणात महिलांचे वजन नियंत्रित राहण्यास मदत होते.

नारळाचे पाणी कधी प्यावे ?
गरोदर स्त्रियांना गरोदरपणाच्या पहिल्या तिमाहीत मॉर्निंग सिकनेस आणि थकवा येण्याची शक्यता जास्त असते. त्यामुळे या काळात नारळपाणी सेवन करणे अधिक फायदेशीर ठरते. गर्भातील बाळाचा मेंदू या तिमाहीतच विकसित होत असतो. त्यामुळे या काळात त्याला सर्वाधिक पोषक तत्वांची गरज असते. नारळाच्या पाण्यातून आई आणि बाळ दोघांनाही आवश्यक पोषक तत्व मिळतात.

नारळाचं पाणी किती प्रमाणात प्यावं ?
गरोदरपणात नारळ पाणी पिणे फायदेशीर आहे. परंतु तुम्ही त्याचे जास्त सेवन टाळले पाहिजे. गरोदरपणात तुम्ही रोज एक ग्लास नारळाचे पाणी पिऊ शकता. नारळ ताजे आणि स्वच्छ आहे हे लक्षात ठेवायला हवं. बुरशीचे किंवा फोडलेले नारळ घेणे टाळावेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Mumbai Water Supply : मुंबईकरांच्या पाण्याची चिंता मिटली, विंधन विहीर खोदकामाला परवानगी

OBC : ओबीसी आरक्षणाच्या लढ्यात भरत कराड यांचा प्राणत्याग; कुटुंबाला आर्थिक मदतीची मुंडेंची मुख्यमंत्र्यांकडे मागणी

Weather News : गरज असल्याशिवाय घराबाहेर पडू नका; राज्यभरात मुसळधार पावसाचा इशारा, 'या' जिल्ह्यांना अलर्ट

Narendra Modi : नेपाळच्या पहिल्या महिला पंतप्रधानांचे मोदींकडून अभिनंदन; भारत-नेपाळ मैत्रीचे अधोरेखन