जपानी पाककृती भारतात लोकप्रिय होण्यात सुशीचा मोठा वाटा आहे. पारंपरिकरित्या सुशी मांसाहारी मानली जाते, मात्र आज शतावरी, एवोकॅडो, काकडी, चीज आणि मसालेदार मेयोनेझपासून व्हेज सुशीही बनते. तसेच निगिरी, उरमाकी, मँगो किंवा पोब्लानो पेपरसारख्या प्रकारांत मांसाहारी सुशीही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे.
सुशीमुळे भारतात जपानी पाककृतीची ओळख झाली, त्यानंतर रामेनने भारतीयांच्या चवीत विशेष स्थान मिळवले. गरम नूडल्स, उकडलेले अंडे, समुद्री शैवाल आणि मसालेदार रस्स्याचा संगम असलेला रामेन आज भारतीय तरुणांमध्ये झपाट्याने लोकप्रिय होत आहे.
जपानी पाककृती ही फक्त चवीपुरती मर्यादित नसून ती एक कलात्मक अनुभव देते. टेप्पान्याकी आता केवळ हॉटेल्समध्येच नव्हे तर लग्न समारंभांमध्येही आकर्षण ठरत आहे. विविध भाज्या तसेच चिकन-मटणाच्या पदार्थांपासून तयार होणारी टेप्पान्याकी पाहणाऱ्यांना आणि चाखणाऱ्यांना भुरळ घालते.
भारतात कोरियन पॉप संस्कृतीप्रमाणेच जपानी अॅनिमे, गेंजीमधील परंपरा आणि जपानी खाद्यसंस्कृतीकडे तरुणांचा ओढा वाढत आहे. त्याचवेळी कोरियन किम्चीनेही भारतासह जगभर लोकप्रियता मिळवली असून, आंतरराष्ट्रीय खाद्यसंस्कृती भारतीयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनत आहे.
मसालेदार टूना रोल, टेम्पुरा श्रिम्प किंवा अशा प्रकारचे पदार्थ स्टार्टर म्हणून मोठ्या आवडीने खाल्ले जातात. ब्रेड क्रम्स आणि खास मसाल्यांच्या मिश्रणातून तयार केलेले हे पदार्थ कुरकुरीत बनतात आणि त्यांच्या चवीमुळे जेवणाची सुरुवातच खास आणि लक्षवेधी ठरते.