लाईफ स्टाइल

Rocky Aur Rani Ki Prem Kahaniच्या आलिशान 'रंधवा मॅन्शन'मध्ये मोठा कांड, एका व्यक्तीची गोळ्या घालून हत्या

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा रॉकी रानी की प्रेम कहानी हा वर्षातील हिट चित्रपटांपैकी एक आहे. दमदार कथा, कलाकार, भव्यदिव्य सेट यांसोबतच चित्रपटातील एका गोष्टीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं, ते म्हणजे ‘रंधावा पॅरडाइज.

Published by : shweta walge

रणवीर सिंग आणि आलिया भट्ट यांचा रॉकी रानी की प्रेम कहानी हा वर्षातील हिट चित्रपटांपैकी एक आहे. दमदार कथा, कलाकार, भव्यदिव्य सेट यांसोबतच चित्रपटातील एका गोष्टीने प्रेक्षकांचं विशेष लक्ष वेधलं, ते म्हणजे ‘रंधावा पॅरडाइज. चित्रपटात दाखवण्यात आलेलं महालासारखं हे घर पुन्हा एकदा चर्चेत आला आहे. येथे एका व्यक्तीची गोळ्या झाडून हत्या करण्यात आल्याचे बोलले जात आहे.

सोमवारी संध्याकाळी ग्रेटर नोएडातील रंधावा पॅराडाईजमध्ये एका ५५ वर्षीय व्यक्तीची हत्या करण्यात आली. ग्रेटर नोएडा पश्चिममधल्या गौर मलबरी फार्महाऊसमध्ये लग्नसमारंभ पार पडला. याच ठिकाणी गाजियाबादचा राहणारा शेखर या व्यक्तीने सोमवारी रात्री 9.30 वाजताच्या सुमारास अशोक यांच्यावर गोळी झाडली. अशोक यांचा मुलगा आणि शेखर यांची मुलगी यांच्या वैवाहिक आयुष्यात समस्या सुरू होत्या. घटस्फोटामुळे या दोन्ही कुटुंबीयांमध्ये वाद सुरू होते.

ग्रेटर नोएडा पश्चिम, उत्तरप्रदेशमध्ये स्थित गौर मलबरी फार्महाऊसमध्ये ‘रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाचं शूटिंग पार पडलं होतं. या चित्रपटात रणवीर सिंहने रॉकी रंधावाची भूमिका साकारली होती. रॉकी रंधावा त्याच्या कुटुंबीयांसोबत या फार्महाऊसमध्ये राहत असल्याचं दाखवण्यात आलं होतं. चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर हा फार्महाऊस फार चर्चेत आला होता.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा