लाईफ स्टाइल

Mango Eating : रात्री आंबा खाताय ? तज्ज्ञांनी सांगितलेले कारण एकदा वाचाच

रात्री आंबा खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

Published by : Shamal Sawant

उन्हाळा सुरू झाला की सगळ्यांनाच आंबे खाण्याचे वेध लागतात. फळांचा राजा असलेल्या आंब्याची चव लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनाच मोहात पाडते. मात्र, तुम्हीही रात्री आंबा खाण्याचा विचार करत असाल, तर एक क्षण थांबा! कारण तज्ज्ञांच्या मते, रात्री आंबा खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकते.

आरोग्याचे चार मोठे धोके – रात्री आंबा खाल्ल्याने काय होऊ शकते?

1. पचनक्रियेवर वाईट परिणाम

रात्री शरीराची पचनक्रिया मंदावते. अशा वेळी आंब्यासारखे जड आणि साखरयुक्त फळ खाल्ल्यास गॅस, अपचन, पोटदुखी आणि जडपणाची तक्रार होऊ शकते.

2. रक्तातील साखरेत वाढ

आंब्यामध्ये नैसर्गिक साखर (फ्रुक्टोज) भरपूर असते. रात्री त्याचे सेवन केल्यास रक्तातील साखरेची पातळी झपाट्याने वाढू शकते. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे विशेषतः धोकादायक ठरते.

3. वजन वाढण्याचा धोका

आंब्यामध्ये कॅलरीज जास्त असतात. रात्री शारीरिक हालचाल कमी असल्यामुळे त्या कॅलरीज बर्न होण्याऐवजी फॅटच्या स्वरूपात साठवल्या जातात. परिणामी वजन वाढू शकते.

4. झोपेचा त्रास

आंबा खाल्ल्यानंतर शरीरात ऊर्जा वाढते. यामुळे रात्री विश्रांती घेणे कठीण होते आणि झोपेची गुणवत्ता खालावते.

जर तुम्हाला आंब्याचा आस्वाद घ्यायचाच असेल, तर तो सकाळी किंवा दुपारी घ्या. यावेळी शरीराची पचनक्रिया कार्यरत असते आणि ऊर्जा देखील व्यवस्थित वापरली जाते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Weather Update : पुढील 2 दिवस राज्यात मुसळधार पावसाचा इशारा

Latest Marathi News Update live : आज राज्य मंत्रिमंडळाची बैठक

Latest Marathi News Update live : राज्यपाल आचार्य देवव्रत छत्रपती शिवाजी पार्कमध्ये

Horoscope | 'या' राशीच्या व्यक्तींच्या आयुष्यात खूप प्रगती होईल, कसा आहे आजचा दिवस? पाहा राशीभविष्य