लाईफ स्टाइल

Summer Tips : उन्हाळ्यात मुलांना सर्दी, ताप, डिहायड्रेशनपासून वाचवण्यासाठी काही सोपे उपाय

प्रखर ऊन, घाम, थकवा यामुळे मुलं पटकन आजारी पडतात.

Published by : Shamal Sawant

उन्हाळा सुरू झाला की लहान मुलांची तब्येत बिघडण्याचे प्रमाण वाढते. कधी सर्दी, कधी खोकला, तर कधी ताप! त्यात प्रखर ऊन, घाम, थकवा यामुळे मुलं पटकन आजारी पडतात. त्यामुळे उन्हाळ्यात त्यांची काळजी घेणं गरजेचं आहे.

उन्हाळ्यात होणारे मुख्य त्रास आणि त्यावर उपाय

1. उष्माघात

दुपारी उन्हात जास्त वेळ खेळल्यास मुलांचं शरीर गरम होतं, घाम येत नाही आणि चक्कर येऊ शकते. अशावेळी मुलांना थंड जागी ठेवा आणि त्यांना पाणी द्या. दुपारी १२ ते ४ या वेळेत त्यांना घरातच ठेवा.

2. त्वचाविकार

घाम आणि धूळ यामुळे मुलांना पुरळ, रॅशेस येतात. त्यामुळे त्यांना हलके, सुताचे कपडे घालावेत. रोज अंघोळ करून शरीर कोरडं ठेवणं आवश्यक आहे. थंड पाण्याने धुणं आणि गुलाबपाणी लावणं फायद्याचं ठरतं.

3. पचनाच्या तक्रारी

शिळं आणि उघड्यावरचं अन्न खाल्ल्याने पोट बिघडू शकतं. म्हणून मुलांना नेहमी ताजं अन्न द्या. उकळून थंड केलेलं पाणी पाजावं. फळं स्वच्छ धुवून द्यावीत आणि आहारात हलकी जेवणं ठेवावीत.

4 . डोळ्यांचे संसर्ग

धूळ आणि घाणेमुळे डोळ्यांत खाज येणे, पाणी येणे ही लक्षणं दिसतात. डोळ्यांवर गॉगल लावावा, आणि बाहेरून आल्यावर चेहरा व डोळे पाण्याने धुवावेत.

5. डिहायड्रेशन

लहान मुलं पाणी प्यायला विसरतात. त्यामुळे त्यांचं शरीर डिहायड्रेट होतं. त्यांना वेळोवेळी पाणी पाजावं. नारळपाणी, फळांचे रस, ताक द्यावं. लघवीचा गडद रंग दिसला, तर हे डिहायड्रेशनचं लक्षण असू शकतं.

पालकांनी या गोष्टी लक्षात ठेवा:

- दुपारी उन्हात मुलांना बाहेर जाऊ देऊ नका

- दिवसभरात वेळोवेळी पाणी पाजत राहा

- सावलीत आणि संध्याकाळीच खेळायला पाठवा.

- सर्दी, ताप झाल्यास डॉक्टरांना दाखवा, वेळ वाया घालवू नका

- अन्न व कपड्यांची स्वच्छता ठेवा

- जास्तीत जास्त द्रवपदार्थ आहारात द्या

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

आजचा सुविचार

North Korea Ban Ice Cream Word : उत्तर कोरियात ‘आईस्क्रीम’ शब्द नॉट अलाऊट! किम जोंग उनचा नवा हुकूम

Lipstick Shades : जाणून घ्या, कोणत्या स्किन टोनवर कोणती लिपिस्टिक सुंदर दिसते

Chhagan Bhujbal : "मिळालेलं आरक्षण नको आहे का?" छगन भुजबळांचा मराठा समाजाला थेट सवाल!