Tanning
Tanning Team Lokshahi
लाईफ स्टाइल

Summer Beauty Tips: उन्हामुळे तुमच्या चेहऱ्यावर टॅनिंग होत असेल तर हे घरगुती उपाय करा

Published by : shweta walge

उन्हाळ्यातील कडक ऊन त्वचेसाठी खूप हानिकारक आहे. सूर्याच्या तीव्र किरणांमुळे तुमच्या त्वचेला सनबर्न (Sunburn), टॅनिंग (Tanning)आणि मुरुमांसारख्या समस्या उद्भवू लागतात. उन्हामुळे तुमचा चेहराही कोरडा आणि निर्जीव दिसू लागतो. पण काही घरगुती उपाय तुमचा रंग सुधारण्यास मदत होऊ शकते.

दूध, मध आणि लिंबाचा फेस पॅक

टॅनिंग आणि सनबर्न सारख्या समस्यांपासून सुटका मिळवण्यासाठी तुम्ही लिंबू, मध आणि दही यांचा फेस पॅक वापरू शकता.

  • हा पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात एक चम्मच दूध, मध आणि लिंबाचा रस एकत्र करा.

  • मिश्रण चांगले मिसळा आणि टॅनिंग झालेल्या भागावर लावा.

  • कोरडे झाल्यानंतर 15-20 मिनिटांनी चेहरा धुवा.

बेसन, हळद आणि लिंबू फेस पॅक

बेसन, हळद आणि लिंबू या तीन गोष्टींचा वापर केल्याने चेहरा चमकतो. यासोबतच सनबर्न आणि टॅनिंगसारख्या समस्यांपासूनही आराम मिळेल.

  • पॅक बनवण्यासाठी एका भांड्यात 2 चम्मच बेसन, 1 चम्मच हळद आणि लिंबाचा रस एकत्र करा.

  • या मिश्रणामध्ये थोड पाणी घालून एक गडद पेस्ट तयार करुन घ्या.

  • 10 ते 15 मिनिटे हे पॅक चेहऱ्यावर लावा आणि नंतर धुवा.

कोरफड (Aloevera)

चेहऱ्यावरील टॅनिंग दूर करण्यासाठी तुम्ही कोरफडीचाही वापर करू शकता. कोरफडमध्ये असे अनेक आवश्यक घटक आढळतात ज्यामुळे तुमचा चेहरा चमकतो. तुम्ही एलोवेरा जेल चेहऱ्यावर चांगले लावा. 15-20 मिनिटांनी चेहरा थंड पाण्याने धुवा.

दही (Yogurt)

सनबर्न आणि टॅनिंगपासून आराम मिळवण्यासाठी तुम्ही दही वापरू शकता. यामुळे तुमच्या चेहऱ्यावरील टॅनिंगची समस्या दूर होईल. थंड दही घ्या आणि ते 15-20 टॅनिंग भागावर लावा आणि नंतर साध्या पाण्याने धुवा. असे नियमित केल्याने तुमचे टॅनिंग दूर होईल.

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई