उन्हाळ्यामध्ये सगळ्यांनाच ऊसाचा रस प्यायला आवडते. ऊसाचा रस प्यायल्याने शरीराला गारवा मिळतो आणि तरतरीतपणा येतो. मात्र ऊसाच्या रसाचे सेवन काही वेळेस घातकदेखील ठरू शकते. जर काहीही काळजी न घेता प्यायले गेले तर त्याचे विपरीत परिणाम शरीरावर होऊ शकतात. त्यामुळे भर उन्हात ऊसाच्या रासचे सेवन करणार असाल तर काय नुकसान होऊ शकते त्याबद्दल आपण आता जाणून घेऊया.
बॅक्टेरियल इन्फेक्शन :
खूप उकाडा असेल तर ऊसाचा रस लवकर खराब होण्याची शक्यता असते. तसेच रस उघड्यावर असेल तर त्यामध्ये बॅक्टेरिया वाढण्याची शक्यता असते.
साखरेचे प्रमाण वाढू शकते :
कडक उन्हात उसाचा रस प्यायल्याने साखरेची पातळी अचानक वाढू शकते. खरंतर, कडक उन्हात शरीर आधीच डिहायड्रेटेड असते, अशा परिस्थितीत उसाचा रस जास्त प्रमाणात प्यायल्याने रक्तातील साखर वाढू शकते. मधुमेहींसाठी धोकादायक असू शकते.
प्रतिकारशक्तीवर परिणाम
संक्रमित किंवा दूषित उसाचा रस पिल्याने शरीरात विषारी पदार्थ प्रवेश करू शकतात, ज्यामुळे रोगप्रतिकारक शक्ती कमकुवत होऊ शकते. म्हणून, कडक उन्हात ठेवलेला उसाचा रस पिणे टाळा.
इतर सवधानी काय बाळगाल :
नेहमी स्वच्छ जागेवरून ताजे काढलेला उसाचा रस प्या. रस पिण्यापूर्वी, रस मशीनची स्वच्छता तपासा. जड जेवणानंतर किंवा रिकाम्या पोटी लगेच पिऊ नका. कडक उन्हात घाम गाळल्यानंतर, थोडी विश्रांती घ्या आणि नंतर उसाचा रस प्या. मधुमेही रुग्णांनी डॉक्टरांचा सल्ला घेतल्यानंतरच उसाचा रस घ्यावा.