Sunrise Benefit Team Lokshahi
लाईफ स्टाइल

सूर्यप्रकाशामुळे आपल्या आरोग्याला 'हे' 4 अत्यंत महत्त्वाचे फायदे

शरीरचक्राचा आणि आपल्या शरीरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा असतो संबंध

Published by : Team Lokshahi

आपल्या शरीरात 24 तासांचं जैवचक्र असतं. पृथ्वीला स्वत:भोवती फिरण्यासाठी जेवढा वेळ लागतो त्यानुसार जैवचक्राचं काम चालतं. या शरीरचक्राचा आणि आपल्या शरीरात घडणाऱ्या प्रत्येक गोष्टीचा संबंध असतो. आपण काय खातो, कधी झोपतो, संप्रेरकांची निर्मिती या सगळ्याचा आणि शरीरचक्राचा घनिष्ट संबंध असतो.

बंदिस्त ठिकाणी राहणाऱ्या माणसांचं शरीरचक्र व्यवस्थित कार्यरत राहत असते. मात्र आपलं शरीर प्रकाशाला त्वरित प्रतिसाद देतं. प्रकाशाच्या आगमनासह आपल्या शरीरातली अनेक कार्य सुरू होतात.

प्रकाशामुळे झोप लागते

प्रकाशामुळे आपल्या शरीरात झोपेची प्रक्रिया सुरू होते. प्रकाशामुळे आपल्या मेंदूत जागं राहण्यासाठीची केंद्र सक्रिय राहतात. प्रकाश कमी झाला किंवा अंधार झाला की, आपल्या शरीरात मेलाटोनिन नावाचं रसायन स्रवतं.

काही एअरलाईन्स (Airlines) कंपन्या जेट लॅग टाळण्यासाठी केबिन लायटिंगचा उपयोग करत आहेत. बोर्डिंगवेळी प्रखर प्रकाश, जेवणादरम्यान दिवे मंदावले जातात. सूर्यास्ताचा भास निर्माण करतील अशी प्रकाशयोजना प्रवासी झोपताना केली जाते. जेणेकरून त्यांना सहज झोप लागू शकेल.

प्रकाश निद्रानाश टाळू शकतो

आपण रात्री झोपण्याआधी स्मार्टफोन (Smartphone) वापरत असतो. काहीजण लॅपटॉप किंवा टॅब्लेट वापरतात. या उपकरणांमधून निळा प्रकाश बाहेर पडत असतो. या प्रकाशामुळे शरीरात झोपेसाठी तयार होणारं संप्रेरक स्रवत नाही. त्यामुळे मेंदूकडून झोपेसाठी आज्ञा दिली जात नाही. युकेतील वैद्यकीय तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासानुसार आपण झोपण्यापूर्वी काही तास गॅझेटविरहित राहायला हवे.

याव्यतिरिक्त बेडरूममध्ये गॅझेट्स नसणं आणखी फायदेशीर ठरू शकते. एलईडी प्रकाश झोप लागण्यासाठी पूरक ठरू शकतो. मात्र न्यूरोसायंटिस्ट मॅथ्यू वॉकर प्रकाशाचं आणि झोपेचं नातं समजावून सांगतात. दिवसा मिळणारा प्रकाश आपल्या झोपेचं गणित ठरवतो. तुम्हाला निद्रानाशाचा त्रास असेल, तर तुम्ही सकाळच्या वेळी तासभर सूर्यप्रकाशात काढला तर तुमच्या मेंदूला योग्यवेळी झोपेचं समीकरण उलगडेल. सकाळच्या वेळी पुरेसा सूर्यप्रकाश मिळाला असेल तर रात्री झोपल्यावर लगेच झोप येते.

प्रकाश मूड बदलवतो

नैसर्गिक प्रकाश आपला स्वभाव पालटवू शकतो. प्रकाशाची वारंवारता आपल्याला आनंदी करू शकते. जेव्हा आपलं शरीर प्रकाशाला सामोरं जातं तेव्हा मज्जासंस्थेच्या माध्यमातून मेंदूला सूचना मिळते. त्यावेळी मेंदूत सेरॅटॉनिन हे संप्रेरक स्रवतं. या संप्रेरकामुळे आनंदलहरी उमटतात. तसंच जी माणसं शिफ्टमध्ये काम करतात, त्यांचा प्रकाशाशी संपर्क मर्यादित राहतो. त्यामुळे त्यांना नैराश्याचा त्रास होऊ शकतो.

थंडीत दिवस छोटा होत जातो त्यावेळी शरीराला नैसर्गिक सूर्यप्रकाश मिळण्याचं प्रमाण कमी होत जातं. त्यावेळी सीझनल अफेटिक्व्ह डिसऑर्डर अर्थात SAD हा आजार होऊ शकतो. हा आजार म्हणजे आपलं शरीरचक्र विस्कळीत होणं. थेट सूर्यप्रकाश मिळण्याचं प्रमाण कमी झाल्याने या आजाराची शक्यता बळावते.

हा आजार तुम्हाला झाला असेल तर SAD लॅम्प मिळतो. या मशीनद्वारे नैसर्गिक प्रकाशाशी साधर्म्य साधणारा प्रकाश बाहेर सोडला जातो. अर्धा तास सकाळी लख्ख सूर्यप्रकाशात काढला तर हा आजार होण्याची शक्यता कमी होते.

सूर्यप्रकाश आपली हाडं बळकट करतो

कॅल्शिअम आणि फॉस्फेट ग्रहण करण्यासाठी आपल्या शरीराला 'ड' जीवनसत्वाची आवश्यकता असते. निरोगी हाडं, दात आणि स्नायूंसाठी महत्वपूर्ण असलेली प्रथिनं.

'ड' जीवनसत्वाची कमतरता असेल तर हाडं ठिसूळ आणि कमकुवत होऊ शकतात. ड जीवनसत्वाचा सगळ्यात मोठा स्रोत सूर्यप्रकाश आहे. म्हणूनच या जीवनसत्वाला सनशाईन जीवनसत्व असंही म्हणतात. आश्चर्य म्हणजे शरीराला सूर्यप्रकाश मिळाला की 'ड' जीवनसत्वाची निर्मिती होते. म्हणूनच थोडा वेळ सूर्यप्रकाशात उभं राहिलं तरी पुरेसं होतं. मात्र अति सूर्यप्रकाश घातक ठरू शकतो. सनस्क्रीन लावायला विसरू नका आणि टळटळीत उन्हात जाणं टाळा.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : त्रिभाषा सूत्र विरोधात शालेय शिक्षण अभ्यास आणि कृती समन्वय समिती आक्रमक

Baby Trafficking Pune : पुण्यात गुन्हेगारीचा सापळा; 40 दिवसांच्या बालकाची विक्री, 6 आरोपी अटकेत

Dhurandhar Movie Teaser Out : रणवीर सिंगचा रावडी लूक; 'धुरंधर'च्या टीझरनं वाढवली चाहत्यांची उत्सुकता

CM Devendra Fadnavis Podcast : पंढरपूरातून मुख्यमंत्र्यांच पहिलं पॉडकास्ट, म्हणाले, "वारी ना इस्लामी राजवटीत थांबली, ना..."