Benefits Of Tulsi
Benefits Of Tulsi Team Lokshahi
लाईफ स्टाइल

तुळशीचे 'हे' आहेत लाभकारी फायदे

Published by : shamal ghanekar

आपल्या घराच्या अंगणामध्ये लावली जाणारी तुळस हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. तसेच तुळसीला ‘क्वीन ऑफ हर्ब्स’ देखील म्हटलं जातं. तुळस ही विविध आजांरावर गुणकारी असून ती सौंदर्याच्या दृष्टीने त्वचा आणि केसांसाठीही उपयुक्त आहे. तसेच तुळशीची सकाळ संध्याकाळी पुजाही केली जाते. काही खाद्यपदार्थांमध्येही तुळसीचा वापर केला जातो. ब-याचदा रोगप्रतिकारकशक्ती वाढवण्यासाठी आपल्या घरात बहरलेली पवित्र तुळस ही खूप महत्त्वाची असते.. आम्ही तुम्हाला या लेखातून सांगणार आहोत की तुळशीचे कोणकोणते गुणधर्म आहेत.

  • अनेकदा आपल्याला सर्दी-पडसं हे खूप साधा आजार वाटतो पण यामुळेच खूपजण तस्त्र होत असतात. पण घराबाहेर बहरलेल्या पवित्र तुळशीच्या मदतीने तुम्ही सर्दी-पडश्यापासून कायमची सुटका मिळवू शकता. तसेच तुळस तापासाठी खूप लाभकारी आहे.

  • रोजच्या धावपळीच्या जगात अनेकजण मानसिक त्रास आणि तणावयुक्त जीवन जगताना दिसतात. तसेच ब-याचदा औषधांचा काहीही उपयोग होत नाही. अशावेळी अनेकजण घरगुती उपाय करत असतात. तुळशीच्या पानांमध्ये अॅंटीस्ट्रेससारखे घटक असल्याने ते माणसाला मानसिक तणावातून मुक्त करते. डोकेदुखीवरील रामबाण उपाय म्हणून तुळशीची पानांचा वापर केला जातो.

  • काळी मिरची आणि तुळशीच्या पानाचा गोळा तयार करून तो दाताच्या खाली ठेवल्याने आपल्याला होणाऱ्या दातांच्या वेदनांपासून आराम मिळतो.

  • तुळशीच्या पानाचा रस तयार करून तो हलक्या गरम पाण्यामध्ये मिक्स करून त्या पाण्याने गुळण्या केल्याने घशाच्या समस्येपासून आराम मिळतो. त्यामुळे घशाच्या समस्येसाठी तुळसही खूप फायदेशीर आहे.

पुन्हा संघर्षयोद्धा मनोज जरांगे पाटील चित्रपटाची टीम राज्यभर दौऱ्यावर

Hair Growth: केस गळतीमुळे त्रस्त आहात? एकदा नक्की वापरून पाहा 'हे' जादुई तेल...

पंतप्रधान मोदी यांच्या सभेत झालेल्या गोंधळावर जयंत पाटील यांची प्रतिक्रिया, म्हणाले...

Mahayuti Sabha: आज महायुतीची जाहीरसभा! पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे एकाच मंचावर

Sanjay Raut : फक्त आमची सभा होऊ नये म्हणून प्रधानमंत्र्यांना बोलवण्यात आलं