केस निरोगी आणि मजबूत बनवण्यासाठी प्रत्येतजण काहींनाकाही उपाय करत असतात. अनेक फुले केसांच्या आरोग्यासाठी देखील खूप फायदेशीर असतात.जास्वंदाचे फूल केवळ केसांची वाढच करत नाही तर केसांची स्थिती सुधारते. जास्वंदाचे फूल आणि त्याची पाने दोन्ही केसांसाठी खूप फायदेशीर आहेत.
केसांवर आणि टाळूवर गुलाब पाण्याची फवारणी केल्याने कोंडा कमी होतो, केस मऊ होतात. रगुती केसांचे तेल बनवताना त्यात गुलाबाच्या कोरड्या पाकळ्या टाकल्यास त्याचा फायदा होतो.
चमेलीच्या फुलांचा वापर तुम्ही केस वाढीसाठी करु शकता. तुम्ही त्याचे तेल नारळ किंवा बदामाच्या तेलात मिसळूनही वापरू शकता.
येथे दिलेली माहिती घरगुती उपचार आणि सामान्य माहितीवर आधारित आहे. अवलंब करण्यापूर्वी वैद्यकीय सल्ला घ्या. लोकशाही मराठी न्यूज याची पुष्टी करत नाही.