Tips For Fresh Eggs
Tips For Fresh Eggs team lokshahi
लाईफ स्टाइल

Tips For Fresh Eggs: तुम्ही देखील खराब अंडी खाता आहात का? असे ओळखा...

Published by : Team Lokshahi

अंड्यांमध्ये अनेक प्रकारचे पोषक घटक असतात. जे आरोग्यासाठी खूप महत्वाचे आहेत. कॅल्शियम, हेल्दी फॅट, सोडियम, पोटॅशियम, लोह आणि इतर अनेक पोषक घटक त्यात आढळतात. कधीकधी अंडी खराब होतात. जे ओळखणे कठीण असते. अशी खराब अंडी खाल्ल्याने आरोग्याला धोका निर्माण होऊ शकतो. म्हणून आम्ही तुम्हाला काही टिप्स सांगणार आहोत ज्याच्या मदतीने तुम्ही खराब अंडी ओळखू शकता.

आजकालच्या काळात प्रत्येकाची धावपळ सुरू असते. त्यामुळे झटपट रेसिपी बनवायची असेल तर अंड्यांपेक्षा चांगला पर्याय नाही. अंडी ही एक अशी वस्तू आहे जी आपल्या घराच्या फ्रीजमध्ये नेहमी आढळेल, परंतु आपण ती कधी विकत घेतली हे आपल्याला क्वचितच आठवत असते.

आपण कधीही अंडी खराब होतील याबद्दल सहसा विचार करत नाही. अंडी फ्रीजमधून बाहेर काढा आणि वाया न घालवता वापरा, असेच आपण दरवेळी करतो. खराब अंडी खाल्ल्याने आरोग्याला अनेक धोका निर्माण होऊ शकतात. चांगली अंडी आणि वाईट अंडी कशी ओळखायची ते जाणून घेऊया.

अंडी ताजी आहेत हे कसे ओळखावे-

*फ्लोट टेस्ट-

तुम्ही पाण्याने भरलेले एक भांडे घ्या आणि त्यात अंडी घाला. जर तुम्हाला ती पाण्यात बुडताना दिसली तर समजून घ्या की अंडी योग्य आणि ताजी आहे. जर अंडी भांड्याच्या पृष्ठभागावर उभी पडलेली असतील तर ती थोडी जुनी असतील आणि जर अंडी वर तरंगत असतील तर ती लगेच फेकून द्या.

*स्पॉट टेस्ट-

यासाठी तुम्हाला कच्चे अंडे फोडावे लागेल. जर तुम्हाला अंड्यातील पिवळ बलकावर लाल ठिपके किंवा तो रंग बदलताना दिसला तर समजून घ्या की हे अंडे खराब होणार आहे, कारण अंड्यातील रासायनिक अभिक्रियामुळे हा रंग खराब होतो.

*अंड्यांचा वास घ्या-

फोडलेल्या अंड्यांना खूप वास येत असेल मग त्यांना फेकून देण्याची वेळ आली आहे.

*आवाजाने ओळखा-

आपल्या कानाजवळ एक कच्चे अंडे घ्या आणि ते चांगले हलवा. जर अंडे खराब झाले असेल तर अंड्यातून काही द्रव पदार्थ हलण्याचा आवाज ऐकू येईल.

"पाकिस्तानचा झेंडा घेऊन मिरवणाऱ्या उबाठाच्या उमेदवारांवर कारवाई करा"; किरण पावसकरांचा ठाकरेंवर हल्लाबोल

IPL 2024 : आरसीबीने CSK विरोधात रचला इतिहास; टी-२० क्रिकेटमध्ये 'हा' कारनामा करणारा ठरला पहिला संघ

"लोकसभा निवडणुकीच्या चार टप्प्यांमध्ये महाविकास आघाडीनेच बाजी मारलीय"; काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोलेंचा मोठा दावा

"एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री करायला तयार होतो"; शरद पवारांच्या विधानाला संजय राऊतांनी दिलं रोखठोक प्रत्युत्तर, म्हणाले...

Patanjali: बाबा रामदेव पुन्हा अडचणीत; पतंजलीवर मोठी कारवाई