लाईफ स्टाइल

नैसर्गिक आणि चमकदार त्वचा मिळविण्यासाठी, घरीच 'या' 2 खास नैसर्गिक नाईट क्रीम तयार करा

Published by : Siddhi Naringrekar

आपल्या आरोग्याची काळजी घेण्यासोबतच आपल्या त्वचेची काळजी घेणे देखील खूप महत्वाचे आहे. कारण वाढत्या वयाबरोबर आपली त्वचा देखील बदलू लागते. त्यामुळे चेहऱ्यावर सुरकुत्या पडणे, त्वचेवर निस्तेज होणे अशा समस्या उद्भवतात. म्हणूनच हे महत्त्वाचे आहे की तुम्ही वयाच्या कोणत्याही टप्प्यावर असाल, पण तुमच्या त्वचेच्या काळजीसाठी वेळ काढायला विसरू नका. त्वचेची काळजी घेण्यासाठी सर्वोत्तम वेळ रात्री आहे. कारण दिवसा सूर्यप्रकाश आणि धूळ यांच्या संपर्कात आल्याने त्वचेची काळजी कमी होऊ शकते. त्यामुळे रात्रीच्या वेळी त्वचेची काळजी घेतल्यास नैसर्गिकरित्या तुमच्या त्वचेला फायदे मिळू शकतात. या समस्येसाठी तुम्ही घरच्याघरी नाईट क्रिम तयार करु शकता. ज्यामुळे तुमच्या त्वचेच्या अनेक समस्यांपासून सुटका मिळू शकते. तसेच, ते तुमच्या त्वचेला नैसर्गिकरित्या टवटवीत करण्यात मदत करू शकते.

एलोवेरा नाईट क्रीम

एलोवेरा नाईट क्रीम ही अतिशय हलकी क्रीम आहे. याच्या वापराने तुमची त्वचा तेलकट दिसणार नाही. त्यात बदामाचे तेल असल्यामुळे ते तुमच्या त्वचेवरील डाग कमी करण्यास मदत करेल. तर गुलाबजल तुमच्या चेहऱ्यावर चमक आणण्यास मदत करेल.

क्रीम वापरण्यासाठी, रात्री चेहरा धुतल्यानंतर, क्रिम घ्या आणि 2 मिनिटे चेहऱ्यावर मसाज करा. तुम्ही ही नाईट क्रीम तुमच्या कोणत्याही फेस पॅकमध्ये मिसळूनही वापरू शकता.

साहित्य

एलोवेरा जेल - 2 ते 3 टीस्पून

गुलाब पाणी - 1 ते 2 टीस्पून

बदाम तेल - 1 टीस्पून

लॅव्हेंडर तेल - 7-8 थेंब

एलोवेरा नाईट क्रीम कसे बनवायचे

एका भांड्यात 3 चमचे एलोवेरा जेल आणि 2 चमचे गुलाबजल मिक्स करा. यानंतर त्यात १ चमचा बदामाचे तेल मिसळा आणि लॅव्हेंडर तेलाचे काही थेंब टाकून मिश्रण तयार करा. ही नाईट क्रीम तयार झाल्यावर डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवा. यामुळे तुमची नाईट क्रीम जास्त काळ खराब होणार नाही.

रोझ वॉटर आणि कोको बटर नाईट क्रीम

गुलाबपाणी त्वचेवर नैसर्गिक टोनर म्हणून काम करते, जे तुमच्या त्वचेच्या टोनसाठी फायदेशीर ठरू शकते. त्यात असलेल्या कोको बटरमुळे तुमची त्वचा हायड्रेट होईल आणि मॉइश्चराइजही होईल. याचा नियमित वापर केल्याने सुरकुत्याच्या समस्येतही आराम मिळतो.

तुमच्या त्वचेच्या बारीक रेषा कमी करण्यासोबतच, बदामाचे तेल डाग कमी करण्यासाठी देखील उपयुक्त आहे. कोरड्या त्वचेच्या लोकांसाठी ही नाईट क्रीम चांगला पर्याय ठरू शकते.

कोको बटर - 2 टीस्पून

गुलाब पाणी - 2 ते 3 चमचे

मध - 1 टीस्पून

बदाम तेल - 1 टीस्पून

प्रथम एका भांड्यात कोको बटर आणि बदामाचे तेल टाकून हलके गरम करा. मिश्रण थंड झाल्यावर त्यात मध आणि गुलाबजल टाका. त्यानंतर डब्यात टाकून फ्रीजमध्ये ठेवा. रात्री झोपण्यापूर्वी फेस वॉश केल्यानंतर ते लावा आणि झोपा.

घाटकोपरच्या होर्डिंग दुर्घटनेतील मृतांच्या कुटुंबियांना ५ लाखांची मदत, दोषींवर कारवाई करण्यासाठी CM शिंदेंनी दिल्या सूचना

T20 वर्ल्डकपनंतर रोहित शर्मा घेणार निवृत्ती? हार्दिक पंड्याच्या निवडीबाबत मोठी अपडेट आली समोर

दिनविशेष 14 मे 2024: जाणून घ्या 'या' दिवसाच्या महत्त्वाच्या घटना

मुंबई, ठाणे, रायगडला अवकाळी पावसानं झोडपलं! वादळी वाऱ्यामुळं घाटकोपरमध्ये होर्डिंग कोसळलं, ४ जणांचा मृत्यू

"राहुल गांधी तुम्ही पाकिस्तानला घाबरा पण आम्ही भाजपवाले आहोत", पालघरमध्ये अमित शहांचा इंडिया आघाडीवर घणाघात