एप्रिल-मे महिने सुरू झाले की उन्हाचा तडाखा जास्त जाणवतो, आणि त्यासोबत एक सामान्य पण त्रासदायक समस्या समोर येतात. "उन्हाळी लागणे". यामुळे शरीरात उष्णता वाढते, लघवी करताना जळजळ होते आणि तहानही अधिक लागते. वेळेत लक्ष दिले नाही तर त्रास गंभीर होऊ शकतो. आयुर्वेदात यावर प्रभावी उपाय सांगितले आहेत.
उन्हाळी लागते म्हणजे नेमकं काय होतं?
लघवी करताना जळजळ, खवखव किंवा वेदना
लघवीचा रंग गडद होणे
अंगात उष्णता वाढणे
अशक्तपणा व चक्कर येणे
तहान अधिक लागणे
ही लक्षणं दिसू लागली की "उन्हाळी"ची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे वेळीच योग्य काळजी घेणे आवश्यक आहे.
उन्हाळी लागली तर काय करावे?
शीत व स्निग्ध आहार घ्या: चंदन, वाळा, धणे यांचे उकळलेले व गार केलेले पाणी प्या.
दूध व गोड पदार्थ: दूध, श्रीखंड, ताक, खीर यांचा आहारात समावेश करा.
विश्रांती घ्या: शरीराला थंडावा देणाऱ्या गोष्टी करा. उन्हात जाणं टाळा.
हलका आहार: पचायला सोपा व उष्णता कमी करणारा आहार घेणे फायदेशीर.
उन्हाळ्यात घामामुळे शरीरातील पाणी झपाट्याने कमी होतं. यामुळे मूत्रमार्गावर दुष्परिणाम होतो आणि जळजळ होते. त्यामुळे दिवसभरात भरपूर (८–१० ग्लास) पाणी पिणे आवश्यक आहे. पाण्याबरोबरच नारळपाणी, लिंबूपाणी, ताक यांचा सुद्धा उपयोग होतो.
- अतितिखट, मसालेदार अन्न
- मांसाहार व मद्यपान
- गरम पाणी पिणे
- दिवसा झोप घेणे
- उन्हात थेट फिरणे
हे सर्व सवयी शरीरातील उष्णता वाढवतात आणि उन्हाळीचा धोका अधिक करतात.
उन्हाळा हा ऋतू आनंदाने घालवण्यासाठी योग्य आहार-विहार गरजेचा आहे.‘उन्हाळी’ ही लाजिरवाणी गोष्ट नाही, पण दुर्लक्ष केल्यास ती त्रासदायक होऊ शकते. म्हणूनच, आरोग्यदायी दिनक्रम ठेवून, नैसर्गिक उपायांचा अवलंब करा. या उन्हाळ्यात आरोग्याच्या बाबतीत "कूल" राहा!