उन्हाळा सुरु झाला आहे. उन्हाळ्यात तापमान मोठ्या प्रमाणात असल्यामुळे गरम जास्त होत. त्यामुळे कॉलेज, क्लास तसेच जॉबला जाणाऱ्यांना पडणारा सर्वात मोठा प्रश्न म्हणजे, कोणत्या प्रकारचे कपडे परिधान करावे. तसेच हे कपडे स्वस्त किमतीत मिळणार कुठे? तसं तर उन्हाळ्यात सहसा हिरवा, पिवळा, लव्हेंडर, निळा आणि पेस्टल अशा रंगाचे हलके कपडे कपडे परिधान केले जातात. कारण हे रंग थंडावा देणारे आहेत. त्यामुळे उन्हाळ्यात अशा रंगाचे कपडे परिधान केल्यामुळे तुम्हाला थंडावा मिळू शकतो. तसेच कॉटन, रेयॉन, लिनन, शिफॉन आणि जॉर्जेट अशा प्रकारचे कपडे परिधान केले जातात. पण या रंगाचे आणि अशा वेगवेगळ्या कापडाचे स्टाईलिश कपडे मुंबईमध्येच कुठून घ्याल जाणून घेऊया.
दादर स्टेशन
दादर हे मुंबईतील एक नावाजलेलं मार्केट आहे. त्यामुळे दादारला मोठ्या प्रमाणात गर्दी पाहायला मिळते. दादरमध्ये तुम्हाला 200 ते 300 च्या किमतीत सुंदर आणि ट्रेंडी कपडे मिळतील. तसेच याठिकाणी तुम्हाला कपड्यांव्यतिरिकित इतरही गोष्टी स्वस्त दरात खरेदी करता येतील.
अंधेरी स्टेशन
अंधेरी पश्चिमेतील हे एक प्रमुख स्ट्रीट मार्केट आहे. याठिकाणी मोठ्यांसकट लहान मुलांसाठी 150 च्या दरापासून टॉप्स, ड्रेस, शॉर्ट्स आणि स्लीवलेस कपड्यांचे विविध पर्याय उपलब्ध आहेत.
ठाणे स्टेशन
ठाणे स्टेशन जवळ देखील तुम्हाला 200 पासून सुरु झालेल्या दरात उत्तम कपडे मिळतील. त्यामुळे शर्ट्स, टॉप्स, नेट कपडे, बंडी आणि कॉटन टी-शर्ट्स स्वस्त दरात खरेदी करु शकता.
हिल रोड, लिंकिंग रोड वांद्रे
वांद्रेतील हिल रोड आणि लिंकिंग रोड अत्यंत प्रसिद्ध मार्केट आहेत. ऑफिस वियर, कॅज्युअल वेअर इत्यादी प्रकारच्या कपड्यांची खरेदी तुम्ही करु शकता. तसेच महिलांसाठी ट्रेंडी टॉप्स, ड्रेस, शॉर्ट्स आणि जीन्स यांसारखे कपडे या मार्केटमध्ये उपलब्ध आहेत.
कोलाबा कॉजवे
कोलाबा कॉजवे हे प्रामुख्याने विदेशी पर्यटकांसाठी प्रसिद्ध मार्केट आहे. उन्हाळ्यात खरेदी करण्यासाठी कोलाबा कॉजवे एक आकर्षक पर्याय आहे. तसेच या ठिकाणी तुम्हाला भेटवस्तू आणि शोकेसच्या वस्तू कमी दारात मिळतील.
सीएसटी सबवे
सीएसटी स्टेशनजवळील सबवेमध्ये मोठ मार्केट आहे. तुम्हाला लहान मुलांपासून ते मोठ्यांपर्यंत ट्रॅक पँट्स तसेच पोलो आणि नाईक ब्रँडच्या कॉपी टी-शर्ट्स मिळतील. तसेच हा मार्केट विशेषत: पुरुषांसाठी ओळखला जातो तसेच उन्हाळ्याच्या कपड्यांसाठी विविध पर्याय याठिकाणी उपलब्ध आहेत.