लाईफ स्टाइल

Pre- Wedding Grooming: लग्नसराईची आधुनिक तयारी; लग्नाला असा द्या ग्लॅमरस टच

लग्नसराईची तयारी: नवरा-नवरीसाठी प्री-वेडिंग ग्रुमिंग टिप्स, ट्रेंडी फॅशन आणि दागिन्यांचा ग्लॅमरस टच.

Published by : Team Lokshahi

लग्न म्हणजे केवळ दोन हृदयांचे मिलन नाही, तर दोन संस्कृती, परंपरा आणि आठवणींचा संगम आहे. या खास दिवशी सर्वांच्या नजरा नवरा-नवरीकडे असतात. त्यामुळे त्यांच्या सौंदर्यांची, पोशाख आणि आत्मविश्वासाची तयारी ही सध्या अधिक विचारपूर्वक केली जाते. त्यामुळे आपल्या आयुष्याच्या महत्त्वाच्या दिवशी आपण अधिकच सुंदर दिसेल. जाणून घेऊया नवरा नवरी लग्नासाठी काय तयारी करतात.

प्री- वेडिंग ग्रुमिंग- प्री- वेंडिग ग्रुमिंग याचा अर्थ लग्नाच्या आधी चेहऱ्याची घेतलेली काळजी आहे. त्यासाठी सध्या बाजारात अधिक पर्याय उपलब्ध केलं आहे. जाणून घेऊया नवरी ग्रुमिंगसाठी काय काय करु शकते

नवरीसाठी :

- HydraFacial, व्हिटॅमिन C थेरपी, नैसर्गिक स्किन पॉलिशिंग

- केरॅटिन हेअर स्पा, स्काल्प ट्रिटमेंट, आणि समारंभपूर्व ट्रायल लुक्स

- नेल आर्ट, आयब्रो शेपिंग, आणि त्वचेसाठी सानुकूल स्किन प्रोग्राम

नवरदेवासाठी :

- डीटॉक्स फेशियल्स, दाढी शार्पनिंग, आणि वैयक्तिक हेअरस्टाइल

- डोळ्यांखालचा थकवा कमी करणारे उपचार

- फास्ट ट्रॅक ग्रूमिंग पॅकेजेस – व्यस्त नवरदेवांसाठी विशेष लोकप्रिय

सध्या ही तयारी स्किन एक्स्पर्ट्स, डाएटिशियन आणि वैयक्तिक सल्लागारांच्या मार्गदर्शनाखाली होते. सौंदर्य आता सायन्सवर आधारित आहे.

2. स्टाईलची रंगत: पारंपरिकतेतून ट्रेंडी फॅशनकडे वाटचाल

नवरीसाठी:

- पेस्टल, रॉयल ब्लू आणि बेज गोल्ड लहंगे ट्रेंडमध्ये

- टिश्यू सिल्क व ऑर्गेन्झा साड्या – सुसंस्कृततेची नवी परिभाषा

- इंडो-वेस्टर्न गाऊन्स, बेल्टेड साड्या संगीत आणि मेंदीसाठी परफेक्ट

नवरदेवासाठी :

- फ्लोरल शेरवानी, बांधणीचे कोट, आणि क्लासिक टर्बन

- प्रिंटेड कुर्ता सेट्स, हलक्या रंगसंगतीसह

- नेहरू जॅकेट्स आणि नवरीसोबत मॅचिंग ड्रेसिंग – नवा रोमँटिक ट्रेंड

- थीम ड्रेसिंग हे आता नवदांपत्यांच्या फॅशनची खरी ओळख बनली आहे – प्रत्येक समारंभ एक नवीन स्टोरी सांगतो!

3. दागिन्यांचा ग्लॅमरस टच: पारंपरिकतेत साजलेली आधुनिकता नवरीसाठी : - कुंदन, पोल्की आणि टेंपल ज्वेलरीचा नवा साज - मोत्यांचे चोकर, झुमके आणि डिझायनर कडे - प्रत्येक लूकसाठी खास निवड – म्हणजे सौंदर्याला एक नवा अर्थ नवरदेवासाठी : - स्टेटमेंट माला, ब्रोचेस, आणि टर्बन पिन्स - Minimal accessories पण व्यक्तिमत्त्व खुलवणारे - कस्टम कफलिंक्स आणि हेरिटेज वॉचेस – स्टाईलसाठी शेवटचा टच!

4. फोटोशूट आणि त्या 'परफेक्ट' क्षणांसाठी सजावट

प्रि-वेडिंग फोटोशूटसाठी नैसर्गिक मेकअप व फ्लोईंग लुक्स

प्रत्येकासाठी खास सुगंध – fragrance layering

लग्नाच्या आधीची तयारी ही आता केवळ ड्रेस किंवा ब्यूटी ट्रीटमेंट्सपुरती मर्यादित नाही – ती एक पूर्ण प्रवास बनली आहे. या प्रवासात सौंदर्य, आत्मविश्वास आणि प्रेम या सगळ्यांचा सुंदर संगम पाहायला मिळतो. आधुनिकतेच्या या झगमगाटातही, ही तयारी अजूनही मनाला स्पर्शणारी, संस्कारांची आणि आठवणींनी भरलेली असते.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

ICAI CA Result 2025 : सीए अंतिम परीक्षेचा निकाल घोषित, महाराष्ट्राचा मुलगा राजन काबरा देशात पहिल्या स्थानी

पावसाळ्यात गरमागरम बाजरीची खिचडी खा, अनेक फायदे जाणून घ्या

Rohit Pawar : "परप्रांतीय शिक्षकांच्या भरतीतून..." रोहित पवारांचा भाजपला टोला