थोडक्यात
पासपोर्टमधील पत्ता कसा बदलायचा?
पासपोर्टसाठी पत्ता पुराव्याची संपूर्ण लिस्ट
पासपोर्ट हा तुमच्या ओळखीचा आणि पत्त्याचा प्राथमिक पुरावा
जर तुम्ही अलीकडेच घर बदलले असेल, तर अधिकृत कागदपत्रांमध्ये तुमचा पत्ता अपडेट करणे आवश्यक असते. अनेक ठिकाणी, महत्वाच्या कागदपत्रांवर पत्ता बदलून घेता, तसेच पासपोर्टवरही नवा पत्ता अपडेट करणं महत्वाचं असतं. अशा परिस्थितीत, तुम्ही ‘‘Re-Issue Process’ द्वारे तुमच्या पासपोर्टवरील पत्ता बदलू शकता. तुम्ही शहर बदलले असेल किंवा त्याच परिसरात घर बदलले असेल, या प्रक्रियेद्वारे तुम्ही पत्ता सहजपणे बदलू शकता.
पासपोर्ट हा आपण ज्या देशात राहतो तिथे आणि परदेशातही ओळख आणि पत्त्याचा प्राथमिक पुरावा म्हणून काम करतो. घर बदलताना, तुमचा पत्ता अपडेट न केल्यास खालील परिस्थितींमध्ये समस्या उद्भवू शकतात.
– पासपोर्ट पुन्हा जारी करताना किंवा व्हिसा अर्ज करताना पोलिस पडताळणी
– आंतरराष्ट्रीय प्रवासादरम्यान दूतावास किंवा वाणिज्य दूतावासात पडताळणीसाठी
– बँक KYC किंवा नोकरीसारख्या अधिकृत प्रक्रियांदरम्यान कागदपत्र पडताळणीसाठी
पासपोर्टमधील पत्ता कसा बदलायचा? (ऑनलाइन प्रक्रिया)
1) www.passportindia.gov.in ला भेट द्या. 2) ‘New User Registration’ वर क्लिक करून नवीन खाते तयार करा आणि लॉगिन करा. 3) ‘Apply for Fresh Passport / Reissue of Passport’ हा पर्याय निवजा आणि ‘Reissue’ ऑप्शनवर क्लिक करा. पुढे, कारणांमध्ये ‘Change in Existing Personal Particulars’ हे निवडा. 4) आता तुमच्या पत्त्याच्या पुराव्यानुसार ‘नवीन पत्ता’ प्रविष्ट करा. 5) नवीन पत्त्याचा पुरावा (आधार कार्ड, वीज बिल) इत्यादी अपलोड करा. 6) आता शुल्क भरा. (36 पानांच्या पासपोर्टसाठी 1500 रुपये तर 60 पानांच्या पासपोर्टसाठी 2000 रुपये.) यानंतर, पासपोर्ट सेवा केंद्र किंवा पोस्ट ऑफिस पासपोर्ट सेवा केंद्रात अपॉइंटमेंट बुक करा. 7) तुमच्या अपॉइंटमेंटच्या दिवशी, ‘अपॉइंटमेंट रिसीट, मूळ पासपोर्ट, तुमच्या नवीन पत्त्याच्या पुराव्याची Self-Attested Copy, दोन फोटो’ सोबत ठेवा. 8) जर तुम्ही नवीन शहरात स्थलांतरित झाला असाल तर पोलिस पडताळणी आवश्यक असू शकते. 9) पडताळणीनंतर, तुमचा नवीन पासपोर्ट ‘स्पीड पोस्ट’ द्वारे तुमच्या पत्त्यावर पाठवला जाईल.
पासपोर्टसाठी पत्ता पुराव्याची संपूर्ण लिस्ट
वैध पत्त्याचा पुरावा
आधार कार्ड
मतदार ओळखपत्र (Voter ID Card)
वीज, पाणी किंवा टेलिफोन बिल (3 महिन्यांपेक्षा जुने नसावे)
भाडे करार
बँक स्टेटमेंट (मागील 12 महिन्यांचे)
गॅस कनेक्शन बिल
पती/पत्नींचा पासपोर्ट (जर अर्जदाराचे नाव त्यावर असेल तर)
प्रोसेसिंग टाईम
सामान्य प्रक्रियेनुसार, पोलिस पडताळणी पूर्ण झाल्यानंतर 7 ते 14 कामकाजाच्या दिवसांत नवीन पासपोर्ट पाठवला जातो. तत्काळ योजनेअंतर्गत, सर्व कागदपत्रे बरोबर आणि पडताळणी केलेली असल्यास 1 ते 3 दिवसांच्या आत पासपोर्ट जारी केले जातात.