लाईफ स्टाइल

Eclipse : साल २०२६ चे पहिले ग्रहण कधी ? जाणून घ्या...

नवीन वर्ष येण्यासाठी अजून अवकाश आहे. अजून नवीन वर्षे सुरु होण्यास दोन महिने शिल्लक आहेत. परंतू ग्रहण साल २०२६ च्या जानेवारी महिन्यात लागणार असल्याची चर्चा सुरु आहे.

Published by : Varsha Bhasmare

थोडक्यात

  • साल २०२६ च्या आकाशात यावेळी चार वेळात अंधकार पसरणार

  • हिंदू पंचांग गणनेनुसार नवीन २०२६ च्या वर्षांत दोन सुर्यग्रहण

  • दोन वेळा चंद्र ग्रहणाची स्थिती बनणार आहे.

नवीन वर्ष येण्यासाठी अजून अवकाश आहे. अजून नवीन वर्षे सुरु होण्यास दोन महिने शिल्लक आहेत. परंतू ग्रहण साल २०२६ च्या जानेवारी महिन्यात लागणार असल्याची चर्चा सुरु आहे. परंतू त्यात तथ्य नाही. परंतू या वर्षात केव्हा केव्हा ग्रहण लागणार आहे, ही माहिती जाणून घेऊयात….

खगोल अभ्यासक आणि ज्योतिषशास्राच्या मान्यतेनुसार २०२६ चे पहिले ग्रहण १७ फेब्रुवारी रोजी लागणार आहे. कंकणाकृती (Annular Solar Eclipse) हे सुर्यग्रहण असणार आहे. या ग्रहणात सुर्याच्या सभोवताली अग्नि वृत्त सारखी रिंग दिसणार आहे. आंशिक रुपात हे सुर्यग्रहण भारतातून दिसणार आहे.

३ मार्च २०२६ रोजू चंद्रग्रहण ( खग्रास ) (Lunar Eclipse) पूर्ण लागणार आहे. हे पूर्ण चंद्रग्रहण रात्री भारतासह आशियातील अनेक भागातून पाहाता येऊ शकते. यात सूतककाळ पाळण्याचा ज्योतिषशास्राचे म्हणणे आहे.

१२ ऑगस्ट २०२६ रोजी सूर्यग्रहण (Solar Eclipse)लागणार आहे. हे ग्रहण हरिययाली अमावस्येच्या दिवशी लागणार आहे.हे या वर्षाचे सर्वात चर्चित ग्रहण असणार आहे. अमेरिका आणि युरोपात हे ग्रहण संपूर्णपणे पाहाता येणार आहे. भारतातून मात्र हे सुर्यग्रहण आंशिक रुपाने दिसणार आहे. चंद्राचा काही भाग यावेळी पृथ्वीच्या सावली खाली येणार आहे.

जानेवारी २०२६ मध्ये कोणतेही ग्रहण नाही

काही दिवस जानेवारी २०२६ मध्ये ग्रहण लागणार आणि सूतक पाळला जाणार असल्याची चर्चा होत आहे.. परंतू पंचांगानुसार जानेवारीत ग्रहणाची कोणतीही स्थिती नाही. यामुळे घाबरण्याची काहीही गरज नाही. ग्रहण सुर्य-चंद्र – पृथ्वी एका सरळ रेषेत येतात तेव्हा ग्रहणाची स्थिती तयार होत असते. ही खगोलीय स्थिती जानेवारी २०२६ मध्ये तर तयार होत नाहीए..

ज्योतिषशास्रानुसार काय महत्व ?

ज्योतिषशास्रानुसार पहिले ग्रहण नेहमी वर्षातील घटनाक्रमांचे संकेत देत असते. फेब्रुवारीतील ग्रहण कुंभ राशीच्या सौर प्रभाव आणि सिंह-कुंभ अक्षावर घडणार आहे. ज्यामुळे सत्ता, टेक्नॉलॉजी आणि आर्थिक क्षेत्रात घडामोडी होण्याची शक्यता आहे.तसेच मेष, मिथुन, सिंह, वृश्चिक रास आणि कुंभ रास यांना हे ग्रहण अशुभ असल्याने त्यांना भगवान शंकराची पूजा करावी लागणार आहे.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा