लाईफ स्टाइल

Salt : एकच नाही तर 'इतके' आहेत मिठाचे प्रकार ; फायदेही जाणून घ्या

मिठाच्या वेगवेगळ्या प्रकरांबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया.

Published by : Shamal Sawant

मीठ हा सगळ्यांच्याच जेवणातील एक अविभाज्य घटक आहे. मिठशिवाय जेवणाला चव येत नाही. पांढरं मीठ हा प्रकार सगळ्यांच्याच घरात सापडतोच. पण केवळ पांढरं मीठ हाच मिठाचा प्रकार नाही. तर अजून अनेक प्रकारची मीठ बाजारात उपलब्ध आहेत. मिठाच्या वेगवेगळ्या प्रकरांबद्दल आपण आता सविस्तरपणे जाणून घेऊया.

काळं मीठ : काळं मीठाच्या वापरामुळे पचनक्रिया सुधारण्यास मदत होते. यामध्ये सोडियमच्या तुलनेत कमी प्रमाण असतं म्हणून अनेक लोक पचवणाऱ्या समस्या जसे गॅस आणि अपचन यावर काळं मीठ वापरण्याचा सल्ला देतात.

पांढरं मीठ : पांढऱ्या मिठाचे जास्त प्रमाणात सेवन उच्च रक्तदाब आणि इतर समस्या निर्माण करू शकतं. त्यामुळे, हे मीठ योग्य प्रमाणातच वापरावं आणि त्याबाबत जागरूक असणं महत्त्वाचं आहे.

सैंधव मीठ : सैंधव मीठ हे खडकाच्या रूपात मिळणारं एक अत्यंत शुद्ध मीठ आहे. याला उपवासाचं मीठ म्हणून ओळखलं जातं. सैंधव मीठ अत्यंत कमी प्रक्रिया केलेलं असून त्यात पोटॅशियम आणि मॅग्नेशियमसारखी खनिजं असतात. यामुळे रक्तदाब नियंत्रणात राहण्यास मदत होते.

कोणतं मीठ शरीरासाठी फायद्याचे ?

- आरोग्याच्या दृष्टीने विचार केला तर, सैंधव मीठ एक उत्तम पर्याय ठरू शकतो. या मीठामध्ये नैसर्गिक खनिजं असतात. त्याचप्रमाणे ते शरीरासाठी अधिक उपयुक्त असतं.

- काळं मीठदेखील पचनाच्या दृष्टीने फायदेशीर ठरू शकतं.

- पांढऱ्या मिठाच्या वापराला मर्यादा घालून आणि नैसर्गिक पर्यायांचा समावेश करणे अधिक योग्य ठरेल.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा