उन्हाळ्याच्या वाढत्या तापमानात घरून शाळा, कॉलेज किंवा ऑफिससाठी नेलेलं अन्न लवकर खराब होणं ही एक सामान्य पण गंभीर समस्या आहे. सकाळी अगदी प्रेमाने तयार केलेल्या डब्याला दुपारी उघडल्यावर कुबट वास येणं किंवा चव बिघडलेली जाणं, हे नक्कीच त्रासदायक! पण काळजी करू नका. काही सोप्या उपायांनी तुम्ही हे टाळू शकता. खाली दिलेल्या टिप्स आणि सवयी लक्षात ठेवल्यास जेवण ताजं आणि आरोग्यदायी राहील.
सामान्य प्लास्टिक डब्यांपेक्षा सध्या बाजारात मिळणारे एअरटाइट आणि इन्सुलेटेड डबे अधिक फायदेशीर ठरतात. हे डबे उष्णता नियंत्रित करतात, ज्यामुळे अन्न जास्त वेळ ताजं राहतं.
गरम अन्न डब्यात भरल्याने त्यातून वाफ निर्माण होते. ही वाफ डब्याच्या आत वातावरण ओलसर करते आणि बॅक्टेरिया वाढतात – परिणामी अन्न लवकर खराब होतं. अन्न थोडं थंड झालं कीच डब्यात भरावं.
उन्हाळ्यात मसालेदार, जड आणि तेलकट अन्न टाळा. त्याऐवजी वरण-भात, गोडी डाळ, सूपसारख्या हलक्या आणि पचायला सोप्या पदार्थांची निवड करा. यामुळे अन्नाची टिकवणूक चांगली होते आणि पचनही उत्तम राहतं.
केळी, पपई, द्राक्षं यांसारखी रसाळ फळं इतर अन्नासोबत ठेवल्यास ती लवकर खराब होतात. अशा फळांना नेहमी वेगळ्या डब्यात पॅक करा आणि शक्यतो सकाळी पॅक केल्यावर १-२ तासातच खा.
रात्रीचं अन्न दुसऱ्या दिवशी डब्यात न नेतलेलंच उत्तम. ताजं, सकाळी बनवलेलं अन्न जास्त सुरक्षित असतं. मांसाहारी अन्न तर उन्हाळ्यात लवकर खराब होतं, त्यामुळे शक्यतो टाळावं.
ऑफिसमध्ये फ्रिज असल्यास डबा पोहोचताच लगेच त्यात ठेवा. यामुळे अन्नाचं तापमान स्थिर राहतं आणि बॅक्टेरियांची वाढ मंदावते.
हात धुऊनच अन्न बनवा आणि डबाही स्वच्छ ठेवा. डब्याच्या झाकणाखाली किंवा कोपऱ्यांत अन्न साठलेलं राहिल्यास बॅक्टेरिया वाढण्याचा धोका असतो.
उन्हाळ्यात अन्न खराब होणं ही अटळ समस्या वाटू शकते, पण योग्य सवयी आणि थोडी जागरूकता यामुळे ही समस्या सहज टाळता येते. वरील टिप्स फक्त चव टिकवण्यासाठी नाहीत, तर तुमचं आणि तुमच्या कुटुंबाचं आरोग्य राखण्यासाठी महत्त्वाच्या आहेत. त्यामुळे आजपासूनच या उपायांचा अवलंब करा आणि उन्हाळ्यात ताजं, सुरक्षित जेवण एन्जॉय करा!