HOT WINE SECRETS: HISTORY, SPICES, AND HEALTH BENEFITS OF MULLED WINE 
लाईफ स्टाइल

Alcohol: 'या' देशात पितात गरम वाईन, कारण ऐकून थक्क व्हाल

Hot Wine: दालचिनी, लवंग, जायफळ आणि संत्र्याचा रस मिसळून तयार केलेले हे मसालेदार वाईन स्वादिष्ट आणि आरोग्यासाठी लाभदायक आहे, ज्याचा उल्लेख प्राचीन साहित्यातही आढळतो.

Published by : Dhanshree Shintre

थोडक्यात बातमी वाचण्यासाठी खाली स्क्रोल करा...

वाईनमध्ये मसाले घालून तयार केलेले पेय हे प्राचीन काळापासून लोकप्रिय आहे. वाईनला मसाल्यांचा अनोखा स्वाद येतो, ज्यामुळे त्याचे नाव ग्रीक भाषेत 'हिप्पोक्रास' पडले. रेड किंवा व्हाईट वाईनमध्ये दालचिनी, लवंग, जायफळ यांसारखे गरम मसाले घालून हे पेय तयार केले जाते. लफब्रो विद्यापीठाच्या अभ्यासानुसार, बायबलमधील 'सॉन्ग ऑफ सोलोमन' कवितेतही गरम मसालेदार वाईनचा उल्लेख आहे, जी अंगुरांपासून खास पद्धतीने बनवली जाई.

रेड वाईनपासून तयार होणारी ग्लुवाईन ही सर्वात लोकप्रिय आहे. यात साखर, मध किंवा गोड सीरपाबरोबरच दालचिनी, लवंग, दगडफूल, जावित्री, अदरक, काळे मिरे घालतात. संत्रे, लिंबू यांसारख्या फळांचा रस मिसळून मसाल्यांचा अर्क वाईनमध्ये उतरवला जातो. यामुळे वाईनचा रंग, चव आणि सुगंध वाढतो. लफब्रो विद्यापीठातील इंग्रजी प्राध्यापकांच्या मते, इंग्रजी साहित्यात अनेक ठिकाणी या वाईनचा उल्लेख आहे.

ब्रिटनमध्ये 'मल्ड वाईन' पोहण्याची परंपरा रोमन काळापासून चालत आहे. ज्यांना दारूचा स्वाद नको अशांसाठी मसाले आणि संत्र्याचा वापर करून दारूशिवाय असे पेय तयार केले जाते. हे पेय थंडीच्या दिवसांत गरमागरम पितात, ज्यामुळे आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.

  • गरम वाईनमध्ये दालचिनी, लवंग, जायफळ, अदरक आणि संत्र्याचा रस मिसळतात.

  • ग्लुवाईन ही रेड वाईनपासून तयार होणारी सर्वात लोकप्रिय मसालेदार वाईन आहे.

  • ब्रिटनमध्ये हिवाळ्यात मल्ड वाईन पिण्याची परंपरा रोमन काळापासून आहे.

  • मसालेदार गरम वाईन स्वादिष्ट असून आरोग्यासाठीही फायदेशीर मानले जाते.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा