Winter Hydration 
लाईफ स्टाइल

Winter Hydration: हिवाळ्यात कमी पाणी पिण्यामुळे मूत्रपिंडावर होतील नकारात्मक परिणाम, जाणून घ्या कारण

Kidney Health: हिवाळ्यात कमी पाणी पिण्यामुळे मूत्रपिंडांवर ताण येतो आणि किडनी स्टोन, मूत्रमार्गातील संसर्ग यांसारख्या समस्यांचा धोका वाढतो. हायड्रेटेड राहणे, लिंबू, काकडीचे पाणी आणि फळांचे डिटॉक्स वॉटर उपयुक्त ठरतात.

Published by : Team Lokshahi

हिवाळ्यात लोकांमध्ये सहसा कमी पाणी पिण्याची सवय असते, ज्यामुळे मूत्रपिंडांच्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होऊ शकतो. मूत्रपिंड शरीरातील विषारी घटक फिल्टर करतात आणि त्यांचं योग्य प्रकारे काम करण्यासाठी पुरेसं पाणी आवश्यक असतं. हिवाळ्यात कमी पाणी प्यायल्यास लघवीची मात्रा कमी होते आणि ती अधिक जाडसर होते, ज्यामुळे मूत्रपिंडांवर गाळण्याचा दबाव वाढतो. यामुळे मूत्रपिंडातील दगड तयार होण्याचा धोका वाढतो, तसेच मूत्रमार्गातील संसर्गाची शक्यता देखील वाढते.

थंडीच्या काळात रक्ताभिसरण मंदावते, ज्यामुळे शरीरात पाणी कमी होते आणि उच्च रक्तदाबाचा धोका वाढतो. शरीरात पाण्याची कमतरता वाढल्यास लघवी गडद आणि घट्ट होत जाते, परिणामी विषारी पदार्थ काढून टाकण्याची प्रक्रिया मंदावते. या कारणांमुळे मूत्रपिंडाची कार्यक्षमता कमी होते व पुढील गंभीर आजार उद्भवू शकतात. तज्ज्ञांची मते आहेत की, हिवाळ्यात देखील दररोज किमान सात ग्लास पाणी प्यावे, ज्यामुळे शरीर हायड्रेटेड राहते आणि मूत्रपिंड स्वस्थ राहतात.

फक्त पाणी प्यायलं तरी शरीरातील हायड्रेशनची पातळी टिकत नाही, त्यामुळे नैसर्गिक हायड्रेशन वाढविणारे पदार्थ देखील सेवन करणे आवश्यक आहे. लिंबू, काकडी आणि इतर फळे यांचे डिटॉक्स वॉटर तयार करून पिणे उपयुक्त ठरते. तसेच, संत्र्यांसारखी फळे हिवाळ्यात शरीराला आवश्यक पाणी पुरवतात व डिहायड्रेशन टाळण्यास मदत करतात. कमी पाणी पिण्यामुळे शरीरात थकवा, बद्धकोष्ठता, त्वचेचा कोरडेपणा, डोकेदुखी आणि एकाग्रता कमी होणे यांसारख्या त्रास देखील होऊ शकतात.

थंडी असूनही शरीराला पुरेशं पाणी पुरवणे खूप महत्त्वाचे आहे कारण कमी पाणी पिल्याने मूत्रपिंडावर ताण येतो आणि किडनी स्टोन होण्याचा धोका वाढतो. त्यामुळे दिवसातून भरपूर पाणी पिणे आणि सुपाच्य, हायड्रेटिंग आहार घेणे हिवाळ्यातील आरोग्यासाठी अनिवार्य आहे. यामुळे मूत्रपिंडाचे आरोग्य ठेवता येते, आणि अन्य गंभीर आजारापासून बचाव होतो.

भरपूर पाणी प्या - तहान नसली तरीही हिवाळ्यात दररोज ७ ते ८ ग्लास पाणी पिणे महत्त्वाचे आहे. कोमट पाणी पिणे आरोग्याच्या दृष्टीने अधिक फायदेशीर ठरू शकते.

जास्त मीठ सेवन टाळा - ब्लड प्रेशर असलेल्या व्यक्तींनी हिवाळ्यात खारट पदार्थ, लोणचं आणि फास्ट फूड टाळावे. यामुळे रक्तदाब वाढतो आणि मूत्रपिंडांवर अधिक ताण येतो, तज्ज्ञांचे सल्ले.

शरीर उबदार ठेवणे - हिवाळ्यात थंडीमुळे रक्तदाब वाढतो, ज्याचा परिणाम मूत्रपिंडांवर होतो. शरीर उबदार ठेवण्यासाठी बाजरी आणि गूळ यांसारखे पदार्थ सेवन करा, असे तज्ज्ञांचे सल्ले.

तुमची रोगप्रतिकारक शक्ती वाढवा - कमकुवत रोगप्रतिकारामुळे मूत्रपिंडांसह शरीराला हानी होऊ शकते. तुळस, आले, हळद यांसारख्या औषधी वनस्पतींचे सूप संसर्ग कमी करण्यास मदत करते आणि मूत्रपिंडांना फायदे होतात.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा