woman claims she is pregnant with thirteen babies  team lokshahi
लाईफ स्टाइल

अरे बापरे : ही महिला एकाचं वेळी देणार 13 बाळांना जन्म

महिला एकाचं वेळी 13 बाळांना देणार जन्म

Published by : Shubham Tate

एका गर्भवती (Pregnant) महिलेबाबत असा दावा केला जात आहे की तिच्या पोटात एकाच वेळी 13 मुले वाढत आहेत. यापूर्वी या महिलेने एकदा जुळ्या आणि दुसऱ्यांदा तीन मुलांना जन्म दिला होता. या मेक्सिकन महिलेच्या मुलांच्या संगोपनासाठी देणग्या मागितल्या जात आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार, समुपदेशक गेरार्डो गुरेरो यांनी मदतीचे आवाहन केले असून महिलेच्या पोटात 13 मुले वाढत असल्याचे सांगितले आहे. (woman claims she is pregnant with thirteen babies)

हे प्रकरण मेक्सिकोच्या (Mexico) इक्सटाप्लुका येथील आहे. फायरमन अँटोनियो सोरियानो हे आधीच 6 मुलांचे वडील आहेत. रिपोर्टनुसार, आता त्यांची पत्नी मारित्झा हर्नांडेझ मेंडेझ एकत्र 13 मुलांना जन्म देणार आहे. वृत्तानुसार, स्थानिक नगरसेवक गेरार्डो गुरेरो यांनी लोकांना कुटुंबाला मदत करण्याचे आवाहन केले आहे. ते म्हणाले- मी तुम्हाला एकजुटीचे आवाहन करतो. सर्वप्रथम, मला सांगायचे आहे की तुम्ही या व्यक्तीची (अँटोनियो) ओळख करून द्या आणि एकत्र देणगी द्या जेणेकरून तो त्याच्या कुटुंबाचा खर्च उचलू शकेल.

जेरार्डो पुढे म्हणाले - हा (अँटोनियो) 14 वर्षांपासून अग्निशमन दलाची सेवा करत आहे. पण त्यांना मिळणारा पगार हा 19 मुलांचा सांभाळ करण्याइतका मिळत नाही. गेरार्डोने पुढे सांगितले की, अँटोनियोच्या पत्नीने याआधी एकापेक्षा जास्त मुलांना एकत्र जन्म दिला आहे. ते म्हणाले- 2017 मध्ये तिने पहिल्या मुलाला जन्म दिला. त्यानंतर 2020 मध्ये तिने जुळ्या मुलांना जन्म दिला. 2021 मध्ये अँटोनियोच्या पत्नीने तीन मुलांना जन्म दिला. आणि आता ती लवकरच एकत्र 13 मुलांना जन्म देणार आहे.

सहसा, तज्ञ एकाच वेळी मोठ्या संख्येने मुलांची प्रसूती (delivery) धोकादायक असल्याचे म्हणतात. असे असूनही, गेरार्डो यांनी दावा केला आहे की सर्व 13 मुले अद्याप ठीक असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे. एकाच वेळी एवढ्या मुलांचा जन्म होणे अत्यंत दुर्मिळ आहे. गेरार्डो यांनी महापौर फेलिप अरविझू यांना या प्रकरणात हस्तक्षेप करण्यास आणि कुटुंबाला आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागणार नाही याची काळजी घेण्यास सांगितले आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : "कोण जैन लोक आहेत जी...", फडणवीसांच्या भेटीनंतर राज ठाकरेंची बेस्ट पतपेढी निवडणुकीच्या निकालासह अनेक मुद्द्यांवर प्रतिक्रिया

Latest Marathi News Update live : राज ठाकरे आणि मुख्यमंत्री फडणवीसांमध्ये जवळपास अर्धा तास चर्चा

Gujrat Rain Update : गुजरातमध्ये समुद्र खवळला; तीन बोटी बुडाल्या

Chhatrapati Sambhajinagar : "काळजी घ्या" मृत्यूपूर्वी वडिलांना फोन! सिलेंडरमध्ये खुपसवली कात्री अन् स्फोटादरम्यान CA विद्यार्थ्याचा दुर्दैवी मृत्यू