थोडक्यात
नैराश्याचे अनेक कारणं आहेत…
डिप्रेशनची सुरुवातीची लक्षणे काय?
जगभरामध्ये दरवर्षी कोट्यावधी लोक डिप्रेशन म्हणजेच नैराश्याचा सामना करत आहेत. जागतिक आरोग्य संघटनेच्या अहवालानुसार जवळपास 28 कोटींहून अधिक लोक या समस्येचा सामना करत आहेत. ही केवळ मानसिक स्थिती नाही तर एक गंभीर समस्या आहे. ज्यामुळे व्यक्तीची विचार करण्याची पद्धत, जाणून घेण्याची क्षमता आणि जगण्याच्या पद्धतीवर परिणाम होतो. डिप्रेशनमुळे व्यक्ती सातत्याने उदास निराश आणि न्यूनगंडामध्ये वावरतो. तसेच यावर लवकरच इलाज झाला नाही. तर थेट दैनंदिन कामकाज, नातेसंबंध आणि शारीरिक आरोग्यावर देखील गंभीर परिणाम होऊ शकतात.
नैराश्याचे अनेक कारणं आहेत…
नैराश्याचे अनेक कारणं आहेत. ज्यामध्ये जास्त काळ असलेला तणाव, नात्यांमधील अस्थिरता, आर्थिक परिस्थिती किंवा करिअर संबंधित अयशस्विता, एकाकीपणा, हार्मोनल चेंजेस, झोपेचा अभाव किंवा एखादा दिर्घकालीन गंभीर आजार, कधी-कधी अनुवंशिकता देखील असू शकते. त्याचबरोबर जे लोक जास्त संवेदनशील स्वभावाचे असतात. जीवनात एखादी घटना घडून गेल्याने त्यांना कायम चिंता वाटत राहते. त्याचबरोबर विशेषता महिलांमध्ये हार्मोनल चढ-उतारा व दरम्यान तर तरुणांमध्ये सोशल मीडियाच्या प्रेशरमुळे देखील डिप्रेशन निर्माण होण्याचे शक्यता असते. त्याचबरोबर मानसिक आणि भावनिक आधार न मिळाल्याने देखील एखादी व्यक्ती डिप्रेशनमध्ये जाऊ शकते किंवा डिप्रेशन मधून बाहेरही येऊ शकत नसते.
डिप्रेशनची सुरुवातीची लक्षणे काय?
आता पाहूया डिप्रेशनची सुरुवातीची लक्षणे काय? आहेत डिप्रेशनची सुरुवात ही हळूहळू होते. सुरुवातीला कायम उदास राहणे, कामातील आवड संपणे, भुकेवर तसेच झोपेवर परिणाम होणे, स्वतःला निरुपयोगी आणि अपराधी समजत राहणे, तसेच जीवनात काहीही चांगलं शिल्लक राहीलच नाही. कशात आनंद वाटत नाही. जशी जसजशी ही स्थिती गंभीर होत जाते. तसे हे लोक इतरांपासून अंतर ठेवून राहायला लागतात, बोलणं बंद करतात, एकांतात राहतात. तर गंभीर नैराश्यामध्ये व्यक्ती आत्महत्येचे देखील विचार करू लागतात. अशा अवस्थेत मनोविकार तज्ज्ञांची मदत घेणं अत्यंत गरजेचं. असतं एखाद्या व्यक्तीमध्ये जर ही लक्षणे दीर्घकाळ दिसत असतील. तर त्याकडे दुर्लक्ष करणे योग्य नाही. योग्य वेळी ही लक्षणे ओळखून त्यावर उपचार घेणे अत्यंत गरजेचे आहे.
ही झाली नैराश्याची लक्षणं आणि कारण मात्र नैराश्य दूर करण्यासाठी उपाय नेमके काय? तर यामध्ये तुमच्या भावनांना दाबू नका, तुमच्या भावना एखाद्या विश्वासू व्यक्ती सोबत शेअर करा, आरोग्यदायी आहार आणि पुरेशी झोप घ्या, व्यायाम योग मेडिटेशन हे तुमच्या दैनंदिन दिनचर्यामध्ये समाविष्ट करा, सोशल मीडियाचा वापर मर्यादित करा, जर सातत्याने उदास किंवा निराशा वाटत असेल तर समुपदेशन किंवा डॉक्टरांचा सल्ला घ्या, तुमच्या आवडीच्या गोष्टी आणि ऍक्टिव्हिटी करा. ज्यातून तुम्हाला आनंद मिळेल आणि दुःख विसरण्यास मदत होईल.