लाईफ स्टाइल

नवीन कपडे धुताना रंग जाण्याची भीती वाटते? 'या' गोष्टींची घ्या कळजी रंग न जाता कपडे नव्या सारखे दिसतील

नवीन कपडे खरेदी केल्यावर एक चिंता खालावते ती म्हणजे हे कपडे धुताना त्यातुन जाणारा रंग. नवीन कपडे खरेदी केल्यावर आणि त्यात ते गडद रंगाचे असल्यावर कपडे धुताना नाकी-नऊ येतात.

Published by : Team Lokshahi

नवीन कपडे खरेदी केल्यावर एक चिंता असते ती म्हणजे हे कपडे धुताना त्यातुन जाणारा रंग. नवीन कपडे खरेदी केल्यावर आणि त्यात ते गडद रंगाचे असल्यावर कपडे धुताना नाकी-नऊ येतात. एक तर नवीन कपड्यांचा रंग जातो आणि त्यात तो बाकीचे जे इतर कपडे धुवायला घेतलेले असतात त्यांना देखील लागतो. यामुळे नवीन कपडे रंग गेल्यामुळे दुसऱ्या दिवशीच जुने वाटू लागतात तसेच इतर कपड्यांना नवीन कपड्यांचा रंग लागल्यामुळे ते कपडेसुद्धा खराब होतात.

अशा वेळी काय करावं ते सुचत नाही, ही अडचण दूर करण्यासाठी अनेक महागड्या डिटर्जंटचा वापर करून कपडे धुतले जातात, पण तरी सुद्धा रंग जाण्याची समस्या कमी होत नाही आणि कपड्यांसोबतच महागड्या डिटर्जंटचे ही पैसे वाया गेल्यासारखे वाटू लागते. अशा वेळी नवीन कपडे आणि मुख्य म्हणजे गडद रंगाचे कपडे धुताना काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते. महागडे डिटर्जंट न वापरता घरगुती उपाय करून देखील रंग जाण्यापासून आणि तो इतर कपड्यांना लागण्यापासून थांबवला जाऊ शकतो. कसं ते जाणून घ्या...

नवीन कपडे धुताना वॉशिंग मशीनमध्ये रंग जाणारे आणि नवीन कपडे कधीच धुवू नका. मशीनमध्ये कपडे मिक्स होऊन धुतले जातात यामुळे रंग जाणारे कपडे वॉशिंग मशीनमध्ये धुतले तर त्याने इतर कपडे खराब होऊ शकतात. तसेच गरम पाण्यात कपडे धुतल्याने कपड्यांचा रंग पाण्यात वितळतो त्यामुळे तो इतर कपड्यांना लागू शकतो. यामुळे नवीन कपडे किंवा गडद कपडे हे थंड पाण्यात धुवा, थंड पाण्यात रंग निघत नाही.

तसेच मीठ आणि तुरटीच्या साहाय्याने रंग स्थिर राहण्यास मदत होते. मीठ आणि तुरटीने कपडे धुताना कपडे त्यात थोडावेळ भिजत ठेवा आणि त्यानंतर ते थंड आणि स्वच्छ पाण्याने धुवून टाका असं केल्याने मीठामुळे शरीराला खाज येण्याचा त्रास होणार नाही. अनेकदा असं पाहिल जातं घरातल्या महिला कपडे धुताना त्यात व्हिनेगरचा वापर करतात तो यासाठीच असतो की व्हिनेगर हा कपड्यांचा रंग टिकवून ठेवण्यास मदत करतो. तसेच कपडे धुताना ज्या कपड्यांचा रंग गडद आणि निघून जाण्यासारखा असतो असे कपडे सुर्यप्रकाशात न सुकवता ते घरात हवे खाली सुकवत ठेवा सुर्यप्रकाशात कपडे सुकवल्याने कपड्यांचा रंग उडतो आणि कपडे फिके दिसू लागतात.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Monika Bhadoriya : 'तारक मेहता' फेम 'या' अभिनेत्रींच्या शरीरयष्टीवरुन निर्मात्याचे आक्षेपार्ह विधान, मानसिकदृष्टया खचल्याने तिचा जीवन संपवण्याचा विचार

Maharashtra Top In Digital Payment : UPI व्यवहारांमध्ये महाराष्ट्र अव्वल; मुख्यमंत्र्यांनी दिली माहिती

Gatari 2025 Special Non- veg Recipe: गटारीला घरच्या घरी बनवा 'हे' हॉटेल स्टाईल मासांहार

Akkalkot : छत्रपती संभाजी महाराजांचा एकेरी उल्लेख केल्यानं कार्यकर्ते आक्रमक; अक्कलकोट येथे संभाजी ब्रिगेडच्या प्रवीण गायकवाडांना काळं फासलं