health Lokshahi Team
लाईफ स्टाइल

तुमचं मन सतत विचलित होतय; मग हे वाचाच....

Published by : prashantpawar1

आपल्या दैनंदिन आयुष्यात अनेक गोष्टींमुळे तुमचे लक्ष विचलित होते. टीव्ही, इंटरनेट, (tv and internet)एखादे गाणे, एखादे पुस्तक, एसएमएस, कौटुंबिक ताणतणाव, प्रियजनांचे आजारपण, सहकार्‍यासोबतचे मतभेद किंवा तुमच्या स्वतःच्या आयुष्यातील कोणतीही कमतरता यामुळे तुमच्या कामात अचानक लक्ष विचलित होत असेल तर त्याला सामोरे जाण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. एकाच वेळी वेगवेगळ्या कामांकडे कल असण्याला मानसशास्त्राच्या भाषेत मल्टीटास्किंग (multitasking)म्हणतात.

एकाग्रतेत व्यत्यय आणण्यासाठी मल्टीटास्किंग (multitasking) हा एक प्रमुख घटक आहे. असे विविध संशोधन सिद्धांत मांडतात. यामुळे आपण आपल्या कामावर लक्ष केंद्रित करू शकत नाही आणि त्यामुळे कामाचा वेळ वाया जातो. काहीवेळा यामागे काम अधिक अवघड असल्याचे कारण पुढे केले जाते. तर कधी या भटकंतीतूनही कामात अनास्था दिसून येते. खरं तर तुम्हाला आवडत नसलेली एखादी गोष्ट तुम्ही करत असाल तर लक्ष विचलित होण्याची शक्यता खूप जास्त असते आणि ती बऱ्याच अंशी सामान्य स्थितीही असते. तसेच कामाचे स्वरूप क्लिष्ट असेल तरीही ती गुंतागुंत टाळण्यासाठी लक्ष वळवले जाते.

कधीकधी एकाग्रतेच्या अभावाची कारणे देखील खूप शारीरिक असतात. जसे की थकवा, निद्रानाश, भूक किंवा कोणत्याही प्रकारची अस्वस्थता. एकाग्रतेच्या कमतरतेपासून मुक्त होण्यासाठी, तुम्हाला आधी स्वतःचे निरीक्षण करावे लागेल आणि तुमचे लक्ष कशामुळे सतत भटकत आहे हे जाणून घ्यावे लागेल. ती कारणे ओळखणे आणि त्यावर मात करण्याचे मार्ग शोधा व वेळेचे व्यवस्थापन नेहमी लक्षात ठेवा. तुमचे काम पूर्ण करण्यासाठी कालमर्यादा सेट करा आणि त्याचे पालन करा. दिवसभरात करायच्या कामांची यादी तयार करा आणि त्यात प्राधान्याने पूर्ण करायच्या कामांचा क्रमही तयार करा. जेव्हा काही कारणांमुळे लक्ष विचलित होते तेव्हा काही काळ काम सोडून द्या आणि स्वतःवर जबरदस्ती करू नका.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Latest Marathi News Update live : विधानभवनाच्या पायऱ्यांवर विरोधकांचं आंदोलन

kareena kapoor : “प्राडा नाही तर माझी अस्सलं…” करिना कपूरने कोल्हापुरी चप्पल घालत शेअर केला 'तो' फोटो

Indian Railway Ticket Booking : रेल्वे प्रशासनाचा मोठा निर्णय; आता मिनिटाला निघणार दीड लाख तिकिटे

Raj Thackeray : ठाकरे बंधूंच्या युतीवर अजुनही प्रश्नचिन्ह? मनसे-ठाकरे गटाच्या युतीमध्ये मोठा ट्वीस्ट