PAN-Aadhaar आधारशी लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस 
India

PAN-Aadhaar लिंक करण्याचा आज शेवटचा दिवस; लिंक केलं नसेल तर…

Published by : Shweta Chavan-Zagade

जर तुम्ही आपलं पॅन कार्ड (PAN Card) आणि आधार कार्ड (Aadhaar Card) लिंक केलेलं नसेल तर आपल्याकडे आता फक्त अवघे काही तास शिल्लक आहेत. पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यासाठी 31 मार्च 2022 हा शेवटचा दिवस आहे. जर तुम्ही हे आज करु शकला नाहीत तर उद्या म्हणजे 1 एप्रिल 2022 पासून तुम्हाला त्यानंतर दंड भरावा लागू शकतो. या संदर्भात केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळाने (CBDT) अधिसूचना जारी केली आहे. त्यामुळं आता शेवटचे काही तास उरले आहेत. ज्यांनी ज्यांनी आत्तापर्यंत आधार पॅन कार्डला लिंक केले नाही त्यांनी आज दिवसभरात ते लिंक करुन घेणे गरजेचं आहे.

गेल्या आठवड्यात सरकारने लोकसभेत वित्त विधेयक 2020 मंजूर केले ज्यामध्ये नवीन कलम 234H समाविष्ट करण्यात आलं आहे. ज्या अंतर्गत पॅनकार्ड आधारशी लिंक करण्यास उशीर केल्यास 1000 रुपयांपर्यंत दंडाची तरतूद करण्यात आली आहे.

जर आपण वेळेपूर्वी पॅन-आधार लिंक न केल्यास त्याचे दोन मोठे तोटे आहेत. पहिला म्हणजे आपलं पॅन कार्ड 1 एप्रिल 2021 नंतर अमान्य होईल. तर दुसरा तोटा म्हणजे जर तुम्ही 31 मार्चनंतर लिंक करण्याचा प्रयत्न केला तर तुम्हाला 1000 रुपये लेट फी म्हणून द्यावी लागेल. ITR फायलिंगपासून बँकेच्या KYC पर्यंत पॅनकार्ड आणि आधार या दोन्ही गोष्टी प्रत्येक ठिकाणी आवश्यक असतं. दोन्ही कागदपत्रांपैकी एक तरी गोष्ट आपल्याजवळ असणं गरजेचं आहे.

पाहा पॅनकार्ड आधारशी कसं लिंक कराल:

सगळ्यात आधी इन्कम टॅक्सच्या वेबसाइट incometaxindiaefiling.gov.in वर आपल्याला जावं लागेल.

येथे डाव्या बाजूला तुम्हाला आधार लिंकचा पर्याय दिसेल..

यानंतर एक नवं पेज सुरु होईल, ज्याच्यावर लाल रंगामध्ये लिहलं असेल Click here

जर आपण आधीच आपलं पॅन आणि आधार लिंक केलं असेल तर याच्या स्टेट्सवर क्लिक करुन व्हेरिफाय देखील करु शकता.

जर आपलं पॅनकार्ड हे आधारशी लिंक झालं नसेल तर Click here च्या खाली दिलेल्या बॉक्समध्ये पॅन, आधार नंबर, आपलं नाव आणि दिलेला कॅप्चा कोड अशी माहिती भरावी लागेले.

यानंतर Link Aadhaar या बटणावर आपल्याला क्लिक करावं लागेल. यासोबतच लिंकिंगची प्रक्रिया पूर्ण होईल.

याशिवाय आपण 567678 किंवा 56161 या क्रमांकावर SMS पाठवून देखील आधारशी पॅनकार्ड लिंकिंगचं आपलं स्टेट्स काय आहे त्याची माहिती घेऊ शकता.

उदाहरणार्थ: UIDPAN<स्पेस><12 अंकी आधार नंबर><स्पेस><10 अंकी पॅन नंबर> टाइप कर आपल्याला एसएमएस करावा लागेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Financial Planning : आर्थिक नियोजनामुळे भविष्याच्या आर्थिक अडचणींवर मात कशी करावी?

Sunil Shukla on MNS : "राज ठाकरे तू कौन होता है मराठी सीखने वाला...", सुनील शुक्ला यांची मराठी भाषा वादावरुन जीभ घसरली

Devendra Fadnavis On MNS : "भाषेच्या नावावर गुंडशाही..." मराठी भाषा वादावरुन फडणवीसांचा मनसेला इशारा

Mobile Hang : मोबाईल हँग होण्याची कारणे आणि सुरक्षेचे उपाय ; तुमचा फोन सुरक्षित कसा ठेवावा?