Pashchim Maharashtra

TET Exam Scam: टीईटी परीक्षेत अपात्र असताना पात्र ठरलेल्या १७०१ बनावट शिक्षकाची यादी ‘लोकशाही’च्या हाती

Published by : left

शिक्षक पात्रता परीक्षा (टीईटी) (TET Exam) २०१८ च्या परीक्षेत राज्य शिक्षण परिषदेच्या अध्यक्षांनीच इतरांशी संगनमत करून १ हजार ७०१ अपात्र परीक्षार्थींना पात्र केले असल्याचा ठपका सायबर पोलिसांनी ठेवला होता. या अपात्र आसतानाही पात्र ठरलेल्या १७०१ बनावट शिक्षकाची यादी सर्वात आधी लोकशाही न्यूजच्या हाती आली आहे.

टीईटी (TET Exam) २०१८ च्या परीक्षेत राज्यभरात एकूण १ लाख ५७ हजार ६५० परीक्षार्थी बसले होते. त्यापैकी ९ हजार ६७७ परीक्षार्थी पास झाल्याचा निकाल जाहीर करण्यात आला होता. त्यामध्ये ८१७ परीक्षार्थी हे अपात्र असतानाही त्यांच्याकडून पैसे स्वीकारून एजंटामार्फत त्यांना पात्र असल्याचे दाखवून त्यांची नावे मुख्य निकालात घुसडण्यात आली होती. हा निकाल वेबसाईटवर जाहीर झाल्यानंतर त्यात ८८४ परीक्षार्थींना पात्र असल्याचे दाखवून खोटा निकाल जाहीर केला. अशा प्रकारे २०१८ मधील परीक्षेत १ हजार ७०१ परीक्षार्थींना पात्र केल्याचे दोषारोप पत्रात म्हटले आहे. त्कालीन शिक्षण आयुक्त तांत्रिक सल्लागार अभिषेक सावरीकर आणि जिए सॉप्टवेअर कंपनीचे संचालक अश्वीन कुमार सह इतर जणांनी १७०१ बनावट शिक्षक बनवले होते. दरम्यान आता अपात्र आसतानाही पात्र ठरलेल्या १७०१ बनावट शिक्षकाची यादी सर्वात आधी लोकशाही न्यूजच्या हाती आली आहे.

कोणत्या जिल्हात किती बनावट शिक्षक ?

राज्यात सर्वात जास्त बनावट शिक्षक धुळ्यामध्ये आहेत. 263 शिक्षक आहेत. त्याचबरोबर नाशिक मध्ये 236 बनावट शिक्षक आहेत.जळगावात 219 बनावट शिक्षक आहेत . आणि नंदुरबार मध्ये 204 बनावट शिक्षक आहेत. मुंबई साऊथ 30, मुंबई वेस्ट 68, मुंबई नॉर्थ 83, रायगड 2, ठाणे 102, पालघर 34, पुणे 42, अहमदनगर 22, सोलापूर 28, कोल्हापूर 15, सातारा 5, सांगली 27, रत्नागिरी 1, सिंधुदुर्ग 2, औरंगाबाद 70,जालना 14,बीड 37,परभणी 12,हिंगोली 1, अमरावती 35, बुलढाणा 74, अकोला 13,वाशिम 12 , यवतमाळ 2, नागपूर 2, भंडारा 4,गोंदिया 1, वर्धा 2, गडचिरोली 1, लातूर 7, उस्मानाबाद 6 आणि नांदेड 19.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा