Dr. Babasaheb Ambedkar  Team Lokshahi
ब्लॉग

Ambedkar Jayanti 2022 | दुर्बलांच्या आयुष्यासाठी लढणारे बाबासाहेबांचा हा संघर्ष माहीत आहे का?

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांची १३१ वी जयंती

Published by : Team Lokshahi

राज्यघटनेचे शिल्पकार बाबासाहेब भीमराव आंबेडकर यांची जयंती दरवर्षी १४ एप्रिल रोजी साजरी केली जाते. डॉ. भीमराव आंबेडकर (Dr. Babasaheb Bhimrao Ambedkar ) यांना भारतरत्न प्रदान करण्यात आला आहे. त्यांचे संपूर्ण जीवन संघर्षमय होते. भारताच्या स्वातंत्र्यानंतर देशाच्या संविधानाच्या निर्मितीमध्ये त्यांनी आपले योगदान दिले. दुर्बल आणि मागासवर्गीयांच्या हक्कासाठी बाबासाहेब आयुष्यभर लढले. बाबासाहेबांच्या जयंतीनिमित्त जाणून घ्या बाबासाहेबांबद्दल

डॉ. भीमराव आंबेडकर यांचा जन्म १४ एप्रिल १८९१ रोजी मध्य प्रदेशातील महू या छोट्याशा गावात झाला. त्यांचे कुटुंब मूळचे रत्नागिरी जिल्ह्यातील. आंबेडकरांच्या वडिलांचे नाव रामजी मालोजी सकपाळ, तर आईचे नाव भीमाबाई. डॉ.आंबेडकर. अशा परिस्थितीत त्यांना लहानपणापासूनच भेदभावाला सामोरे जावे लागले.

बाबासाहेब लहानपणापासूनच हुशार आणि अभ्यासात चांगले होते. मात्र, ते महार जातीचे असल्यामुळे त्यांना त्या काळात अस्पृश्यतेसारख्या समस्यांना सामोरे जावे लागले. त्यांच्या सुरुवातीच्या शिक्षणात खूप अडचणी आल्या, मात्र जातीच्या साखळ्या तोडत त्यांनी शिक्षण पूर्ण केले. मुंबईतील एल्फिन्स्टन रोडवर असलेल्या सरकारी शाळेत ते पहिले अस्पृश्य विद्यार्थी होते. पुढे 1913 मध्ये आंबेडकरांनी अमेरिकेतील कोलंबिया विद्यापीठातून पुढील शिक्षण घेतले. 1916 साली बाबासाहेबांना त्यांच्या संशोधनासाठी सन्मानित करण्यात आले ही मोठी कामगिरी होती.

लंडनमध्ये शिकत असताना त्यांची शिष्यवृत्ती संपल्यानंतर ते मायदेशी परतले आणि मुंबईच्या सिडनाम कॉलेजमध्ये प्राध्यापक म्हणून काम करू लागले. 1923 मध्ये, त्यांनी एक प्रबंध पूर्ण केला, ज्यासाठी त्यांना लंडन विद्यापीठाने डॉक्टर ऑफ सायन्स पदवी प्रदान केली . पुढे 1927 मध्ये आंबेडकरांनी कोलंबिया विद्यापीठातून पीएचडीही पूर्ण केली.

बाबासाहेबांना त्यांच्या जीवनात जात आणि विषमतेचा सामना करावा लागला. त्यामुळेच दलित समाजाच्या समान हक्कासाठी ते कार्यरत राहिले. आंबेडकरांनी ब्रिटीश सरकारकडे स्वतंत्र मतदार संघाची मागणी केली होती, ती मंजूरही झाली होती, पण जेव्हा गांधीजींनी निषेधार्थ उपोषण केले तेव्हा आंबेडकरांनी आपली मागणी मागे घेतली.

आंबेडकरांच्या राजकीय जीवनाविषयी सांगायचे तर त्यांनी मजूर पक्षाची स्थापना केली होती. ते घटना समितीचे अध्यक्ष होते. स्वातंत्र्यानंतर त्यांची कायदा मंत्री म्हणून नियुक्ती झाली. नंतर बॉम्बे नॉर्थ मतदारसंघातून देशातील पहिली सार्वत्रिक निवडणूक लढवली पण त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. बाबासाहेब दोन वेळा राज्यसभेतून खासदार म्हणून निवडून आले. त्याचवेळी 6 डिसेंबर 1956 रोजी डॉ.भीमराव आंबेडकर यांचे निधन झाले. त्यांच्या मृत्यूनंतर, 1990 मध्ये, बाबासाहेबांना भारताचा सर्वोच्च सन्मान, भारतरत्न प्रदान करण्यात आला.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा