Sant Rajinder Singh Ji Maharaj Team Lokshahi
ब्लॉग

Gurupurnima : आत्म्याला परमात्यामाशी जोडण्यासाठी सतगुरु माध्यम

प्रत्येक युगात असे संत महात्मे पृथ्वीवर येत असतात जे आमच्या आत्म्याला आंतरिक यात्रेवर घेऊन जाण्यात समर्थ असतात.

Published by : Team Lokshahi

संत राजिंदर सिंह जी महाराज

आषाढ महिन्याची पौर्णिमा ही गुरु पौर्णिमा म्हणून साजरी केली जाते. या दिवशी आपण आपल्या शैक्षणिक तसेच आध्यात्मिक गुरूंचा आदर सत्कार करुन त्यांच्या प्रति श्रद्धा व कृतज्ञता व्यक्त करतो.

सांसारिक जीवनात जेव्हां आपल्याला एखादया विषयाचा अभ्यास करायचा असतो, तेव्हा आपण अशा व्यक्तीकडे जातो, जी त्यात पारंगत आहे आणि तो विषय ती व्यक्ति आपल्याला शिकवू शकते . अश्याच प्रकारे आपल्याला जर आपला आध्यात्मिक विकास करायचा असेल तर आपल्याला अश्या व्यक्ति कडे जावे लागेल जी अध्यात्मात पारंगत आहे. एक पुर्ण सद्गुरु आध्यात्मात पारंगत असतात. सुदैवाने प्रत्येक वेळी या पृथ्वीतलावर एक ना एक पुर्ण सदगुरु अस्तित्वात असतात , जे आपल्याला आपल्यातील आत्मिक शक्तीशी जोडण्यासाठी मदत करतात. प्रत्येक युगात असे संत महात्मे पृथ्वीवर येत असतात जे आमच्या आत्म्याला आंतरिक यात्रेवर घेऊन जाण्यात समर्थ असतात.

संत मताचे संत सांगतात की, परमेश्वराची सत्ता ही कुठल्या न कुठल्या मानवी देहातून कार्य करत असते. मनुष्य इतर मनुष्यांकडूनच शिकत असतो. संत या जगात येतात आपल्याशी आपल्या स्तरावर येऊन बोलण्या साठी,अंतरिक अनुभव प्राप्त करण्याची पद्धत आपल्या भाषेत स्पष्ट करून सांगण्यासाठी, जेणे करुण ते आम्हालाही आंतरिक अनुभव करुन देऊ शकतील. केवळ बोलून किंवा वाचून अध्यात्म शिकता येत नाही. हे केवळ वैयक्तिक अनुभवातूनच शिकले जाऊ शकते आणि असा अनुभव मात्र आपल्याला संपूर्ण सदगुरूच देऊ शकतात.

नामदानानंतर सदगुरु शिष्याच्या अंतरी वास करतात. तेव्हांपासून ते प्रत्येक क्षणी शिष्याबरोबर राहतात व त्याला सगळ्या प्रकारे सुरक्षित ठेवतात. सदगुरुंचे हे संरक्षण केवळ या जगातच नाही तर त्यापलीकडेही कायम राहते. शिष्याच्या कर्माचा भार सदगुरू आपल्या खांद्यावर घेतात व सदैव त्याच्या अवती भवती राहतात. शिष्याच्या मृत्यु वेळी ते त्याच्या सोबतच असतात व त्याच्या पुढील प्रवासात त्याचे मार्गदर्शक बनतात. अश्या वेळी सद्गुरु आपल्या अंतरि प्रकट होतात व सदगुरू आम्हाला प्रेमाने हृदयी लावतात,ते आम्हाला दिव्य प्रकाश्याच्या मध्यभागी घेऊन जातात.

करुणा व ममतेने ओतप्रोत सद्गुरु आम्हाला संकटात पाहू शकत नाहीत. सदगुरु या जगी आम्हाला कर्मांच्या चिखलपासून दुर राहण्याची शिकवण देण्यासाठी येतात, आम्ही कर्माच्या चक्रव्यूहातून बाहेर पडावे, अशी त्यांची इच्छा असते, की ज्यामध्ये अडकून आपण पुन्हा पुन्हा या जगात येत असतो . त्यांची इच्छा असते की आपण आपल्या खर्या पित्याच्या घरी परत जावे , जिथे कोणताही क्लेश किंवा मृत्यु नाही.आमच्या जीवन काळात देखील सद्गुरु आमचे अनेक प्रकारच्या संकटा पासून रक्षण करतात. ते आमच्यावर विविध प्रकारे करत असणाऱ्या कृपांचे, मदतीचे आम्हाला ज्ञान देखील नसते. जो पर्यन्त आम्ही परमात्म्या सोबत एकरूप होत नाही, तो पर्यन्त आमची हर प्रकारे मदत करण्यासाठी सद्गुरु सदैव आमच्या सोबत राहतात. एकदा का पुर्ण सदगुरुद्वारे नामदान मिळाले की सद्गुरु आपल्या शिवनेत्रावर विराजमान होतात व जीवनातील प्रत्येक घडामोडी मध्ये आमची मदत करतात.

सदगुरू हे आपले खरे निस्वार्थ मदतगार असतात, मदतीच्या बदल्यात कोणत्याही प्रकारचा मोबदला ,नाव किंवा कीर्ति त्यांना नको असते. ते आपल्याला मदत करतात, कारण ते आपल्या सर्वांवर प्रेम करतात, त्यांचे स्वतःचे अंतःकरण प्रभु प्रेमाने ओत प्रोत भरलेले असते.

जर आपल्याला या मानव देहाचे उद्दीष्ट पुर्ण करायचे असेल आणि आपल्या आत्म्यांला परमात्म्याशी एकरूप करायचे असेल तर आपल्याला पूर्ण सतगुरुंच्या चरणी जावे लागेल. आपण परमेश्वराला प्रार्थना केली पाहिजे की त्याने वर्तमान क्षणी या जगी आस्तित्वात असणाऱ्या पुर्ण सद्गुरुंच्या चरणी आम्हाला लवकरात लवकर घेउन जावे , जेणेकरून त्यांच्या योग्य मार्गदर्शनाखाली आपण आपली आध्यात्मिक यात्रा शक्य तितक्या लवकर पुर्ण करू शकू आणि आपल्या निजधामी पोहचून कायमस्वरूपी परमात्म्यामध्ये लीन होऊ.

Devendra Fadnavis FICCI : संत्री खाण्याची नवी पद्धत ते चित्रपटाचे दिग्दर्शक; अक्षयच्या प्रश्नांवर फडणवीसांची फ्री स्टाईल उत्तरं

Gold - Silver Price : सोने आणि चांदीच्या दरानं पुन्हा नवा उच्चांक गाठला; चोवीस तासात सोन्याच्या दरात 1,500 रुपयांची वाढ

Ramdas Kadam : 'त्या' वादग्रस्त वक्तव्यावर; रामदास कदमांनी 'का' केली सारवासारव?

Devendra Fadnavis : राजकारणातील रिअल हिरो कोण? अक्षयच्या प्रश्नावर फडणवीसांनी दिले उत्तर

Upendra Dwivedi : वेळीच थांबा,आर्मी चीफ जनरल उपेंद्र द्विवेदीचा पाकिस्तानला इशारा