Sant Rajinder Singh Ji Maharaj Team Lokshahi
ब्लॉग

संत वाणी : सेवेतून देवाचे आशीर्वाद मिळतात

मानव महान कार्य करतो त्यापैकी इतरांची सेवा करणे हे महत्त्वाचे कार्य होय. संत कृपाल सिंह महाराज नेहमी म्हणतात “देत रहा, देत रहा, देत रहा”. अनेकजण आपल्याकडील प्राप्त वस्तू देताना चिंतीत असतात कारण त्याची अशी समजूत असते की दिल्याने आपल्याला कमतरता भासेल.

Published by : Team Lokshahi

- संत राजिंदर सिंह जी महाराज

मानव महान कार्य करतो त्यापैकी इतरांची सेवा करणे हे महत्त्वाचे कार्य होय. संत कृपाल सिंह महाराज नेहमी म्हणतात “देत रहा, देत रहा, देत रहा”. अनेकजण आपल्याकडील प्राप्त वस्तू देताना चिंतीत असतात कारण त्याची अशी समजूत असते की दिल्याने आपल्याला कमतरता भासेल. त्यांना ठाऊक नसतं कि सृष्टिच्या विपुलतेच्या नियमानुसार (law of abudance) मोठ्या मनाने आणि कृतज्ञता भावनेने इतरांना दिलेली गोष्ट अथवा वस्तू ती कोणत्याही अन्य मार्गाने आपल्याचकडे  परत येते.

जेंव्हा आपण देतो तेंव्हा आपला कधीच तोटा होत नाही. अशीही शक्यता असते की एखाद्या गरजू व्यक्तीस मदत करण्याची संधी मिळते, त्याग करण्याची संधी, त्यानुसार आपण दिलेली वस्तू आपल्याला परत मिळाली असेल, किंवा परिस्थिती बदललेली असेल, किंवा ती वस्तू देण्याची गरजच वाटली नसेल. तरी सुद्धा दुसऱ्यांची सेवा करण्यामुळे समाधानाचे जे बक्षीस मिळते तेंव्हा आपल्याला जाणवतं की आपल्यावर प्रभु कृपेचा वर्षाव होत आहे. आपण देवाचे आभार मानतो की आपण स्वार्था ऐवजी सेवाभावाची निवड केली.

इतरांना देण्यासारखी अन्य कोणतीही प्रसन्नता नाही. जे निस्वार्थ भावनेने देतात त्यांना कळून चूकते की देण्याने कधीच नुकसान होत नाही. न मागता भरभरून कृपेचा वर्षाव आपल्यावर होत असतो आणि आपल्या आत्म्याचे परमात्म्याशी एकरुप होण्याचे ध्येय कमी कालावधीत प्राप्त करू शकतो. आपल्या हृदयात प्रभू प्रेमाची भर पडते. सेवा करण्यामुळे आपल्याला मिळालेल्या प्रेरणेतून आपण अध्यात्मिक मार्गावर वेगाने प्रगती करू शकतो.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद

Thackeray Vijayi Melava : शिंदेच्या शिवसेनेकडून ठाकरेंच्या युतीवर प्रश्नचिन्ह? म्हणाले "राज ठाकरे कुठेही असं म्हणाले नाही..."

Thakare Bandhu Special Report : राज-उद्धव यांच्या दुश्मनीचा इतिहास काय?, नेमकं कुठं बिनसलं होतं? जाणून घ्या...

Vaibhav Suryavanshi : वैभव सूर्यवंशी नावाचे वादळ पुन्हा जोमात, 52 चेंडूत 10 चौकार अन् 7 षटकारांसह इंग्लंडला चोपल