Sant Rajinder Singh Ji Maharaj Team Lokshahi
ब्लॉग

संत वाणी : आपण  कधीही एकटे नसतो

जीवन जगत असताना काही लोकांना या जगात आपण एकटेच आहोत असे वाटू लागते. याच बरोबर आपल्याला परमात्म्याच्या अस्तित्वावर शंका निर्माण होते. जर ते विश्वास ठेवतात की परमात्मा आहे तर ते विचार करतात की जगात कोटीने लोक असताना ते आपल्या बद्दल कसे जाणू शकतात?

Published by : Team Lokshahi

-  संत राजिन्दर सिंह जी महाराज

जीवन जगत असताना काही लोकांना या जगात आपण एकटेच आहोत असे वाटू लागते.  याच बरोबर आपल्याला परमात्म्याच्या अस्तित्वावर शंका निर्माण होते.  जर ते विश्वास ठेवतात की परमात्मा आहे तर ते विचार करतात की जगात कोटीने लोक असताना ते आपल्या बद्दल कसे जाणू शकतात?

आजच्या या आधुनिक युगात कदाचित परमेश्वरा  सारख्या  शक्तिवर आपण विश्वास ठेवणे अवघड आहे,  जो या सृष्टीचा निर्माता आहे आणि प्रत्येक प्राण्यावर प्रेम करतो.  आपल्याला वाटते की ब्रह्मांडामध्ये केवळ एक मात्र मानव आहे जो प्रेमाचा अनुभव करतो,  कारण त्याने या जगात आई-वडील आणि मुलांच्या मधील प्रेमाला किंवा पती- पत्नी आणि कुटुंबामधील प्रेमाचा अनुभव स्वतः घेतला आहे.  त्याने पिता-परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव कधी घेतला नाही कारण आपण या बाहेरील डोळ्यांनी पिता-परमेश्वराला पाहू शकत नाही. तरी पण आपल्याजवळ अशी अनेक उदाहरणे आहेत, जे या जगात दिव्य-प्रेमाचे संकेत देतात.  एक असे प्रेम जे ज्याला मिळाले तो अनुभव करतो.  परंतु त्याला पाहू शकत नाही तरी पण तो विद्यमान आहे.

परमात्मा सृष्टीच्या अणू-रेणू मध्ये विद्यमान आहे आणि प्रत्येक क्षण आपला सांभाळ करत आहे. फक्त एवढ्या साठी आपण त्याच्या प्रेमाबद्दल जाणत नाही, याचा अर्थ असा नाही की ते प्रेमच नाही. पिता-परमेश्वर आपल्यावर प्रचंड प्रेम करतात परंतु याबाबत आपण अनभिज्ञ असतो.

आपण पिता-परमेश्वराच्या प्रेमाचा अनुभव कसा करू शकतो आणि त्याच्या अस्तित्वाची जाणीव कशी होऊ शकते ?

जेव्हा आपण सृष्टीत काही अद्भुत घटना पाहतो तेव्हा आपल्याला पिता-परमेश्वर असण्याचा आभास होतो. जेव्हा आपण पाहतो की सूर्य आणि इतर ग्रह एकमेकांना टक्कर न देता सौर मंडळात आपले स्थान स्थिर करतात. तेव्हा आपल्याला आश्चर्य होते आपण पाहतो की कसे सर्व ग्रहामधून काही ग्रह मानवी जीवनाला आधार देतात. बाकी ग्रह तर खूप उष्ण आहे अथवा शीत आहेत अथवा तेथे श्वास घेण्यासाठी वातावरणाची कमतरता आहे. आपल्याला आश्चर्य वाटते की, पृथ्वीवर जीवन जगण्यासाठी कशाप्रकारे तापमान बनविले आहे, श्वास घेण्यासाठी वायुतत्वाचे मिश्रण यथायोग्य आहे आणि पर्याप्त भूमी आहे, त्यावर आपण राहतो अन्यथा हा फक्त केवळ पाण्याचा ग्रह राहिला असता.

आपल्याला स्वतःच्या जीवनावर आश्चर्य होते की कशा प्रकारे पिता-परमेश्वराने मानव शरीर, जनावरे आणि वृक्ष-वनस्पतींना लाखो वर्षापासून वंश-परंपरागत जिवंत राहण्यासाठी बनविले आहे. मानव शरीरात विभिन्न पद्धती आपल्याला एक चमत्कार वाटतो, जे आपल्याला जेवणे, श्वास घेणे, वाढणे, उत्पत्ती करणे आणि रोग निवारण करणे. या व्यतिरिक्त मानवी मेंदू पण एक मोठा चमत्कार आहे, ज्यामुळे आपण ज्ञान प्राप्त करतो, शिकतो, योजना बनवितो, विश्लेषण आणि नवीन-नवीन वस्तू निर्माण करतो.

आपल्याला हे पाहून आश्चर्य होईल की, पृथ्वीचे चक्र विश्वास बसायला कठीण आहे, कसे जलचक्रामुळे या ग्रहा मध्ये आणि येथील निवास करणाऱ्याना पिण्यासाठी व साफ-सफाईसाठी हजारो वर्षापासून ताजे पाणी मिळत आहे. आपणास हे पाहून आश्चर्य होईल की, जसे शीला चक्रामुळे खडक तुटून माती, पर्वत, टेकडी किंवा जमीन बनते, ज्याच्यावर आपण राहतो. आपण या गोष्टीने अचंबित होतो की, वनस्पती मनुष्याचा आणि पशूंचा मुख्य आहार आहे. त्याचबरोबर आपल्याला श्वास घेण्यासाठी ऑक्सिजन सुद्धा देतात. शास्त्रज्ञांनी जेवढी या ब्रह्मांडात भौतिक, रसायन, जीव, खगोल आणि भूशास्त्र यांचे ज्ञान प्राप्त केले आहे, तेवढेच या निष्कर्षावर पोहोचले आहे की, कोणत्या तरी दिव्य शक्तीने हे सर्वकाही बनविले आहे.

भौतिक शास्त्रज्ञांनी या व्यतिरिक्त अध्यात्मिक शास्त्रज्ञ ज्यांना आपण संत-महापुरुष सुद्धा म्हणतो, ज्यांनी अंतरीय जगाचा शोध घेतला आहे आणि स्वतःच्या अनुभवाने जीवनाच्या अध्यात्मिकते द्वारे परमात्म्याशी संपर्क केला आहे. ते प्रत्येक युगात, प्रत्येक धर्मात आणि प्रत्येक काळाच्या दरम्यान आले आहेत. आणि सर्वांनी एकच निष्कर्ष काढला आहे की, एक शक्ति आहे ज्यामुळे सर्व सृष्टी बनली आहे, त्याला परमात्मा म्हणा किंवा अन्य नावाने पुकारा. पिता-परमेश्वर प्रेमाचे महासागर आहेत आणि याच प्रेमाच्या शक्तिने त्यांनी सृष्टीची रचना केली आहे. ज्याचे परिणाम स्वरूप सर्व खंड-ब्रह्मांड, हा भौतीक संसार, मनुष्य, पशु, वनस्पती आणि सर्व काही अस्तित्वात आलेत.

ज्या प्रकारे एक मुलगा या गोष्टीपासून अज्ञात असतो की, त्याचे आई-वडीलच्यामुळे त्याचे अस्तित्व आहे, तसेच त्या प्रमाणे आपण पिता-परमेश्वराला जाणत नाही, परंतु तिच शक्ति आहे, जी आपली सांबाळ करते आणि आपल्यावर प्रेम सुद्धा करत आहे.

संत-महापुरुष ज्यानी पिता-परमेश्वराचा अनुभव घेतला आहे, ते आपल्याला सांगतात की जर प्रत्यक्षात आणि पिता-परमेश्वरावर खात्री होण्यासाठी आपल्याला त्याचा अनुभव घेणे आवश्यक आहे. ते आपल्याला पिता-परमेश्वराचा अनुभव घेण्याची साधना शिकवितात. जर एकदा आपण त्याचा अनुभव घेतला तर आपण सुध्दा पिता-परमेश्वरावर विश्वास ठेऊ. आपण त्याचा अनुभव ध्यान-अभ्यासा द्वारे करू शकतो. जर आपण शांत होऊन आपले ध्यानाला "शिवनेत्रावर' एकाग्र केले तर आपण परमात्माच्या ज्योति व श्रुतिच्या संपर्कात येतो. त्यांच्या या स्त्रोताद्वारे आपण परत पिता-परमेश्वरामध्ये लीन होऊ शकतो.

यासाठी आपले प्रथम पाऊल आत्म-प्राप्ती किंवा स्वतःला जाणणे आहे. जर एकदा आपण आपल्या आत्मिक रूपाला जाणले तर, खात्री होईल कि आपण पिता-परमेश्वराशी एकरूप आहोत, तेव्हा आपण प्रभू-प्राप्तीचे ध्येय पूर्ण करू शकू, ज्यामुळे आपण नेहमी हा अनुभव करू शकू की, या जगात आपण एकटे नाहीत परंतु पिता-परमेश्वर सदैव आपल्या सोबत आहेत.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Raj Thackeray : मराठीच्या वाकड्यात जाणाऱ्यांवर राज ठाकरे कडाडले, जाणून घ्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे

Chandrashekhar Bawankule On Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava : "खरा अजेंडा ‘म’ म्हणजे ‘मराठी’ नाही, तर..." ; विजय मेळाव्यानंतर चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया

Sanjay Rauat : "हे सरकार म्हणजे हवा भरलेले फुगे"; विजयी मेळाव्यानंतर राऊतांची पहिली प्रतिक्रिया

Uddhav Thackeray on Devendra Fadanvis : आंतरपाट दूर करणारे अनाजी पंत म्हणत उद्धव ठाकरेंचा फडणवीसांवर थेट निशाणा