Sant Rajinder Singh Ji Maharaj Team Lokshahi
ब्लॉग

संत वाणी : खुशी आणि शांति प्राप्त करण्याचा मार्ग

खुशी आणि शांतता प्राप्त करण्यासाठी मनुष्य अनेक प्रयत्न करीत असतो. बरेच लोक असा विचार करतात की; धन-संपत्ती जमा करून, स्थावर मालमत्ता एकवटून नवीन-नवीन अविष्कार करून सत्ता प्राप्त करतात

Published by : Team Lokshahi

- संत राजिन्दर सिंह जी महाराज

खुशी आणि शांतता प्राप्त करण्यासाठी मनुष्य अनेक प्रयत्न करीत असतो. बरेच लोक असा विचार करतात की; धन-संपत्ती जमा करून, स्थावर मालमत्ता एकवटून नवीन-नवीन अविष्कार करून सत्ता प्राप्त करतात अथवा नावलौकिक प्राप्त करून या विश्वातील सर्व सुख आणि खुशी आपण प्राप्त करू शकू. जर आपण लोकांकडे पाहिले की, ज्यांच्याकडे या सर्व गोष्टी आहेत, ते लोक देखील दुखी आहेत. त्यांना देखील असेच वाटत होते की या गोष्टींपासून त्यांना खुशी प्राप्त होईल. परंतु, या विश्वातील कोणतीही गोष्ट आपल्याला सदा-सदाची प्रसन्नता देऊ शकत नाही, कारण की, या सर्व गोष्टी तात्पुरत्या आहेत.

सर्व संत-महापुरुष आपल्याला समजवतात की, या विश्वातील सर्व वस्तू जडतेने बनलेल्या आहेत आणि त्या एक ना एक दिवस नष्ट होणारच आहेत. परंतु आपला आत्मा जो परमात्म्याचा अंश आहे तो जड पदार्थ नसून चेतन आहे आणि तो सदैव शाश्वत आहे. आपल्या आत्म्याला खरी खुशी तेव्हाच मिळते जेव्हा तो परम पित्याशी जोडला जातो. तेव्हा तो परमानंद, खुशी, प्रेम आणि दिव्य ज्योतीने भरपूर असतो. ध्यान अभ्यास एक असा विधी आहे ज्याच्या द्वारे आपला आत्मा हा दिव्य अनुभव प्राप्त करतो. तेव्हाच आपण आपल्या आत्म्याला जाणू शकतो व प्रभू प्रेमाचे अमृत पिऊ शकतो. जे लोक ध्यान-अभ्यास करतात ते स्वतः सदैव शांति आणि आनंदाने ओतप्रत असतात. ही शांति तात्पुरती नसून सदैव आपल्याबरोबर असते. आपल्याला फक्त आपले ध्यान बाह्य जगातून हटवून आपल्या अंतरी एकाग्र करायचे आहे की ज्यामुळे आपण याची अनुभूती घेऊ शकू.

यावेळी आपले लक्ष बाह्य जगामध्ये पसरलेले आहे. आपण आपल्या पाच इंद्रियांद्वारे बाहेरील संसार आणि भौतिक शरीराला जाणू शकतो. परंतु जर आपण आपले ध्यान दोन्ही डोळ्यांच्या मधो-मध शिव नेत्रावर एकाग्र केले तर आपण आपल्या आत्म्याच्या अंतरी असलेल्या खजिन्याचा अनुभव करू शकू. अंतरी ध्यान टिकवण्याच्या या प्रक्रियेला अनेक नावांने  जाणले जाते. जसे ध्यान-अभ्यास, अंतर्मुख होणे अथवा प्रार्थना करणे ज्यामुळे आपल्याला आपल्या अंतरी शांति प्राप्त होते.

जे लोक अंतरिक शांति चा अनुभव घेतात ते लोक बाह्य जगात देखील शांति प्रस्थापित करण्यात मदतगार होत असतात. ते कसे? कारण की, ते आपल्या अंतरी शांति प्राप्त करून बाह्य समस्यांना फारच शांत पणे सोडवू शकतात आणि हळू-हळू त्या शांतिला आपल्या आजूबाजूच्या लोकांमध्ये प्रसारित करतात.

चला तर! आपण दुसऱ्यांना बदलण्यापेक्षा स्वतः बदलूया. जर प्रत्येक माणसाने व्यक्तिगतरित्या असे केले तर ती वेळ दूर नाही तेव्हा बहुसंख्य लोक शांत राहतील. हीच खरी खुशी, परमानंद आणि शांति प्राप्त करण्याचे साधन आहे. ही शांति तात्पुरती नसून सदैव आपल्या बरोबर राहणारी शांति आहे.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Microsoft Company : 25 वर्षांच्या प्रवासाचा पूर्णविराम! Microsoft चा पाकिस्तानमधून काढता पाय; 'हे' कारण समोर

Imtiaz Jaleel On Thackeray Brothers : "दोघांच्या भांडणात तिसऱ्याचा फायदा होत होता" इम्तियाज जलील यांचा नेमका टोला कोणाला?

Imtiaz Jaleel On BJP : भाजपने शिवसेना फोडली, आता देशालाही तोडणार? इम्तियाज जलील यांचा आरोप

Uttar Pradesh : लखनऊमध्ये दूधविक्रीत धक्कादायक प्रकार; दुधात थुंकून त्याच दुधाची विक्री, सदर प्रकार CCTV मध्ये कैद