Sant Rajinder Singh Ji Maharaj Team Lokshahi
ब्लॉग

ही वेळही निघून जाईल

प्रत्येक मनुष्याला जीवनात चढ-उतारांचा सामना करावा लागतो.

Published by : Team Lokshahi

- संत राजिन्दर सिंह जी महाराज

प्रत्येक मनुष्याला जीवनात चढ-उतारांचा सामना करावा लागतो. हा मानवी जीवनाचा अविभाज्य भाग आहे. तो टाळता येत नाही. प्रश्न असा आहे की जेव्हा आपण आपले जीवन मार्गक्रमण करीत असताना चढ-उतारांना सामोरे जातो, तेव्हा आपण शांतता गमावून अस्थिर होऊ इच्छितो का?आपण आयुष्यात घडणार्याा प्रत्येक घटनेमुळे स्वतःला प्रभावित होऊ दिले, तर आपल्याला असे वाटेल की आपण सर्व वेळ रोलर कॉस्टर वर चाललो आहोत. म्हणजेच आपण आनंदाच्या अतिउच्च शिखरावरून निराशेच्या खोल गर्तेत पोहोचूआणि मग पुढच्या क्षणी आनंदाच्या शिखरावर परत येऊ.

हा सततचा बदल अनेकदा भय, ताण आणि दहशत निर्माण करतो.कारण पुढे काय होईल हे आपल्याला कधीच माहीत नसते. कालांतराने भीती व तणाव असलेली हि अवस्था आपल्या मनाचा अविभाज्य भाग बनते.आपण शांत आणि तणावमुक्त होऊ शकत नाही, कारण जीवनातील चढ-उतारांवर आपले काही खास नियंत्रण नसते. आपण शांति व तणावरहित जीवन कसे जगायचे?

जीवनात वादळ आणि समृद्धी च्या दरम्यान एक शांत जागा शोधून आपण समतोल जहाजात स्थिर होऊ शकतो. आपण ध्यान-अभ्यास व प्रार्थनेद्वारे शांत अवस्थेत पोहोचू शकतो. आपल्या अंतरात सर्व दिव्यशक्ती आहेत. आपण फक्त शरीर आणि मन नसून आत्मा आहोत. आत्मा ज्योती, प्रेम आणि आनंदाने परिपूर्ण आहे. कसं काय? तर आत्म्याचा दिव्य स्रोत परमात्मा हा पूर्ण, ज्योती, प्रेम आणि आनंदाने भरलेला आहे. आत्मा त्याच्याशी सदैव जोडलेला असतो. सृजनशील शक्ती म्हणजे आत्मा आणि परमात्मा एकच तत्त्वाने बनले आहेत. जर आपण दररोज काही वेळ नित्यनियमाने ध्यान-अभ्यास केला तर आपण सुद्धा परम आनंद प्राप्त करू शकतो. तेव्हा कुठे जीवनात आपण बाह्य परिस्थितीमुळे विचलित होणार नाही. शांति आणि समन्वयाने परिपूर्ण भरलेल्या ठिकाणी कसे पोहोचायचे ते आपण शिकू शकतो. ज्यामुळे जीवनाच्या चढ-उतारा नंतरही आपल्याला चिरंतन शाश्वत आनंद मिळत राहील. आपण आपल्या अंतरातील स्थिर अशा अवस्थेसपोहोचू शकतो जे जीवनातील चढ-उतारांशिवाय आपणास शाश्व्त आनंद देऊ शकेल.

Mohammad Kaif On Jasprit Bumrah Captaincy: बुमराहाला कर्णधारपद देण्याआधी दोनदा विचार करावा! जसप्रीतच्या कॅप्टन्सीवर मोहम्मद कैफचे ट्वीट

Ganesh Festival 2025 : गणेशोत्सवापूर्वी सरकारी कर्मचाऱ्यांना पगाराचा गोड प्रसाद

Manikrav Kokate : रिओ वर्ल्ड चॅम्पियनशिपपूर्वी जिनॅस्ट संयुक्ताला क्रीडामंत्र्यांचा फोन; 'महाराष्ट्राची हिरकणी' म्हणून संबोधत गौरविले

Palghar Gas Leak : बोईसर तारापूर MIDC मध्ये पुन्हा वायुगळती; 4 कामगारांचा मृत्यू तर 1 जखमी

Ganesh Festival Pune 2025 : बाप्पा पावला! गणेशोत्सवात 24 तास धावणार मेट्रो, एकदा पाहा वेळापत्रक